Goa Today's Top News: मतदानाच्या अगोदर गोव्यात राजकीय घडामोडी; दिवसभरातील ठळक बातम्यांचा आढावा

Goa Today 04 May 2024 Breaking News: लोकसभा निवडणूक, राजकारण, गुन्हे, क्रीडा, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील बातम्यांच्या अपडेट.
CM On Viriato Fernandes
CM On Viriato FernandesDainik Gomantak
Published on
Updated on

मयेत भाजप विरोधकांची एकजूट

गत विधानसभा निवडणुकीत मयेतून भाजप विरोधात निवडणूक लढवलेले राजकीय पक्षांचे उमेदवार एकत्रित. भाजपचा पाडाव करण्याचा निर्धार. गोवा फॉरवर्डचे संतोषकुमार सावंत, 'आप'चे राजेश कळंगुटकर आणि 'आरजी'चे श्रीकृष्ण परब यांचा एकमेकांच्या हातात हात.

हरवळे रुद्रेश्वर देवस्थान वाद प्रकरण

हरवळे रुद्रेश्वर देवस्थान वाद प्रकरण. डिचोली तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष काशिनाथ मयेकर आणि गिरीश नाईक यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार. निवडणूक आयोगाकडून दोघांनाही कारणे दाखवा नोटीस.

संविधानाचा अपमान करणाऱ्याला गोमन्तकीय मतदान करणार नाहीत - सीएम

CM On Viriato Fernandes

विरियातो फर्नांडिस यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी जाणिवपूर्वक गोव्यात येण्याचं टाळलं. संविधानाचा अपमान करणाऱ्या उमेदवाराला गोमन्तकीय मतदान करणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचे मडगावातील पदयात्रेवेळी वक्तव्य.

CM On Viriato Fernandes
CM On Viriato FernandesDainik Gomantak

एसटी संघटना इंडिया आघाडीसोबत

ST Community Support INDIA Alliance

गोव्यातील एसटी संघनांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला आहे. एसटीच्या राजकीय आरक्षण देण्यात भाजप अपयशी ठरल्याचा आरोप एसटी नेते रुपेश वेळीप यांनी केला.

ST Community Support INDIA Alliance
ST Community Support INDIA AllianceDainik Gomantak

माजी मंत्री दीपक पावस्करांचा भाजपात प्रवेश

सावर्डेचे माजी आमदार आणि माजी PWD मंत्री दीपक पावस्कर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत याच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला आहे. पावस्कर यांचे बधू संदीप आणि इतर कार्यकर्ते देखील भाजपात दाखल.

Deepak pawaskar
Deepak pawaskarDainik Gomantak

ताळगाव सरपंचपदी मारिया फर्नाडिस : सोमवारी घोषणा

Taleigao Election

ताळगाव ग्रामपंचायत सरपंचपदासाठी मारिया फर्नांडिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर उपसरपंचपद सागर बांदेकर या युवा पंचसदस्याकडे देण्याचे निश्चित झाल्याची माहिती मंत्री तथा बाबूश मोन्सेरात दिली.

दोन्ही नावांच्या निवडीची औपचारिक घोषणा सोमवारी करण्यात येणार आहे. ताळगाव ग्रामपंचात निवडणुकीत मंत्री बाबूश मोन्सेरात आणि आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या 'ताळगाव प्रोग्रसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट'ने सर्व 11 जागा जिंकल्या आहेत.

मारिया फर्नांडिस
मारिया फर्नांडिसDainik Gomantak

आचारसंहिता संपल्यानंतर सर्व समस्यांवर तोडगा काढणार - मुख्यमंत्री

CM Pramod Sawant

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची संजीवनी सहकारी साखर कारखान्याला भेट. संजीवनी साखर कारखान्याच्या कामगारांसह दूधसागर टूर ऑपरेटर्स संघटना आणि खाण कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. आचारसंहिता संपल्यानंतर सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन.

CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांनी बजावला मतदानाचा हक्क

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि आरओ आश्विन चंद्रू यांनी पोस्टल बॅटल मतदानाच्या मदतीने मतदानाचा हक्क बजावला.

वास्को येथे कदंबा बस स्थानकाजवळील ट्रान्सफॉर्मरला आग

वास्को येथे कदंबा बस स्थानकाजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरला आग. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण.

आरजीचे विधानसभा उमेदवार श्रीकृष्ण परब यांचा इंडिया आघाडीला पाठिंबा

RG Leader Support INDIA Alliance

आरजीचे मये विधानसभेचे उमेदवार श्रीकृष्ण परब यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लुस फेरेरा, आपचे अमित पालेकर उपस्थित होते.

RG Leader Support INDIA Alliance
RG Leader Support INDIA AllianceDainik Gomantak

आमच्या वाटेला गेलात, तर खबरदार..!

Goa Politics

आमच्या वाटेला गेलात, तर खबरदार..! माजी आमदार नरेश सावळ यांचा आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना गर्भीत इशारा. शैक्षणिक संस्थांनी हस्तक्षेप. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांच्या परवानगीत 'खो' घातल्याचा आरोप.

Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak

सत्तेवर आल्यानंतर एसटी आरक्षणाचा प्रश्न निकालात काढू - प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर

Amit Patkar Goa

काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर गोव्यातील एसटी राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकालात काढला जाईल. यासह प्रलंबित वनहक्क दावे देखील निकालात काढले जातील, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिले आहे.

गोंयकार धेंपेंच्या ऋणात - कृषिमंत्री रवी नाईक

Ravi Naik On Pallavi Dempo

गोंयकार धेंपेंच्या ऋणात आहेत, धेंपेंनी गोव्यात खाण व्यवसाय सुरु केल्याने अनेकांना रोजगार मिळाला. त्या ऋणातून आपण अजून मुक्त झालो नसून, त्यांना मत देऊन या ऋण चुकते करता येईल, असे कृषिमंत्री रवी नाईक म्हापशातील सभेत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com