

मडगाव: अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा सोनसोडो – राय येथील पशु वैद्यकीय दवाखाना पूर्ण झाला असून, लवकरच कार्यान्वित होणार आहे. या दवाखाण्यात प्राण्यांसाठी एक्स – रे आणि सोनोग्राफी सुविधा उपलब्ध असेल. ०९ नोव्हेंबर रोजी या दवाखाण्याचे उद्धाटन होणार आहे.
"यामुळे दक्षिण गोव्यात सेवा सुधारतील," असे पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा (AHVS) संचालक नितीन नाईक म्हणाले.
उत्तर गोव्यातील टोंक येथील पशुवैद्यकीय दवाखाण्यात देखील अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यात आलीय मात्र, तज्ञ कर्मचारी नसल्याची सुविधा कार्यान्वित नसल्याची माहिती आहे. त्यामुळे सोनसोडो येथील दवाखाण्यातील सुविधा प्रथमच उपलब्ध होणारी सुविधा असेल. तीन कोटी रुपये खर्चून हा दवाखाना उभारण्यात आला आहे.
जानेवारी २०१९ मध्ये हा दवाखाना पूर्ण होणे अपेक्षित होते पण, यात अनेक अडचणी येत गेल्या. त्यानंतर सप्टेंबर २०२१ उद्धाटन पुढे ढकलण्यात आले. दरम्यान, यावर्षी १५ ऑगस्ट रोजी या दवाखाण्याचे उद्धाटन होणार होते. नव्याने सुरु होणारा दवाखाना दक्षिण गोव्यातील पशुधन आरोग्य क्षेत्रातील सुविधांसाठी महत्वाचा ठरणार आहे.
सोनसोडो येथील दवाखाना दोन मजली इमारत असून, याठिकाणी लहान, मध्यम आणि मोठ्या अकाराच्या प्राण्यांसाठी सुलभ ठरणार आहे. वरच्या मजल्यारवर प्रामुख्याने लहान प्राण्यांची तपासणी आणि उपचार पुरवले जातील. याठिकाणी प्राण्यांची तपासणी, उपचार, विमा आणि सल्ला अशा सुविधा दिल्या जणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.