

पुणे: जनुकीय बदलांतून सर्वसाधारण तांदळामध्येही सुगंध निर्माण करण्याची किमया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) संशोधकांनी साधली आहे.
वनस्पतिशास्त्र विभागातील संशोधकांनी ‘आयआर- ६४’ जातीच्या तांदळामध्ये बासमतीचा सुगंध निर्माण करत प्रयोगशाळेत त्याच्या तीन पिढ्यांपर्यंत उत्पादनही घेतले आहे. ‘प्लांट फिजिओलॉजी रिपोर्ट्स’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात याबाबतचा शोधनिबंध नुकताच प्रकाशित झाला आहे. जगातील अर्ध्या लोकसंख्येचे मुख्य अन्न हे तांदूळ आहे. तांदूळ उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
क्रिस्प-कॅस तंत्रज्ञान म्हणजे काय?
जिवाणू स्वतःच्या संरक्षणासाठी (इम्यून सिस्टम) नैसर्गिकपणे जे बदल करतात, त्याच आधारावर ‘क्रिस्प-कॅस’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. ज्याला इंग्रजीत ''Clustered Regularly Interspaced Short Palindromic Repeats-CRISPR-associated protein’ असे म्हणतात. हे एक प्रकारचे ‘जेनेटिक एडिटिंग टूल’ आहे.
जैव तंत्रज्ञान क्षेत्रात ‘क्रिस्पर-कॅस’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनुकामध्ये हवे तसे बदल घडवून वनस्पतींमध्ये नवीन गुणधर्म निर्माण करता येतात. ‘आयआर- ६४’ ह्या इंडिका जातीच्या भातामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचे संशोधन झाले आहे. ‘आयआर- ६४’ ला व्यावसायिक लागवडीसाठी मान्यता मिळाली तर परकीय चलन उपलब्ध होऊ शकते. - प्रा. ए. बी. नदाफ, वनस्पतिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
वैशिष्ट्ये
‘आयआर- ६४’ या तांदळावर प्रथमच संशोधन
जनुकांतील बदलानंतर वाढीवर दुष्परिणाम नाही
रोपांची लागवड, पुनरुत्पादनाचा प्रयोग यशस्वी
तीन पिढ्यांनंतरही तांदळातील सुगंध कायम
मर्यादा
संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला अवधी
अजूनही विविध तांत्रिक परवानग्यांची गरज
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.