Nuclear Plant in Goa: खट्टर यांचा मास्टरस्ट्रोक! पर्यटन भूमी बनणार ऊर्जा केंद्र; गोव्यात राबवणार 'अणुऊर्जा प्रकल्प'

Union Minister Manohar Lal Khattar: केंद्र सरकार गोव्यात अणुऊर्जा प्रकल्प उभारून अणुऊर्जेला प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहे
atomic energy project Goa
atomic energy project GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या शहरी विकास आणि ऊर्जा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आढावा बैठक सोमवार (दि. 12) रोजी पार पडली. या बैठकीत गोव्यातील ऊर्जा क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

गोव्यामध्ये ऊर्जा क्षेत्रात चांगली प्रगती होत असून, लवकरच राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं खट्टर यांनी सांगितलं. राज्याच्या भविष्यातील ऊर्जा गरजा लक्षात घेऊन गोवा सरकार अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची शक्यताही पडताळून पाहत आहे.

atomic energy project Goa
Nuclear Attack Safety Tips: एखाद्या देशाने अणुबॉम्ब टाकला तर रेडिएशनपासून कसे वाचावे? जाणून घ्या

खट्टर म्हणाले, "गोव्याने इतर राज्यांच्या तुलनेत खूप चांगली कामगिरी केली आहे, याबद्दल मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं अभिनंदन करतो. गोव्यातील प्रत्येक घरात वीज पोहोचली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. राज्यानं प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनाची आम्हाला माहिती दिली आहे आणि ही योजना नक्कीच पुढे नेली जाईल याची मला खात्री आहे."

'हर घर जल योजने'त गोव्याने १००% यश मिळवले असून, आता सरकार २०२६ पर्यंत २२,००० घरांना रूफटॉप सौर ऊर्जा कनेक्शन देण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करत आहे. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या योजनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, केंद्र सरकार गोव्यात अणुऊर्जा प्रकल्प उभारून अणुऊर्जेला प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहे. केंद्र सरकार गोव्याच्या विकासासाठी पूर्णपणे सहकार्य करेल, असं आश्वासन खट्टर यांनी दिलंय. मुख्यमंत्री सावंत यांनी केंद्राच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि राज्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं.

या बैठकीत गोव्यातील शहरी विकास आणि ऊर्जा क्षेत्रातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. गोव्यातील नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com