GCET: गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, अखेरच्या GCET परीक्षेची तारीख जाहीर

तंत्रशिक्षण संचालनालयाने अखेरची सामाईक प्रवेश परीक्षा मे महिन्यात होणार असल्याचे म्हटले आहे.
GCET
GCETDainik Gomantak

व्यावसायिक शिक्षणासाठी गरजेच्या असलेल्या गोवा सामाईक प्रवेश (GCET) परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने अखेरची सामाईक प्रवेश परीक्षा मे महिन्यात होणार असल्याचे म्हटले आहे. 2024 पासून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी (Medical And Engineering) शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्याच्या पहिल्या विधानसभा अधिवेशनात प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

GCET
Goa CET Scrapped: मोठी बातमी! गोवा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कायमची रद्द

व्यावसायिक महाविद्यालय प्रवेशासाठी यावर्षीची गोवा किमान समान प्रवेश परीक्षा 13 आणि 14 मे रोजी होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे होणाऱ्या या परीक्षेचे गुण अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी महत्वाचे आहेत. भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि गणित (Maths) या विषयांत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर, वैद्यकीय, दंत, होमिओपॅथी महाविद्यालयांचा प्रवेश नीट परीक्षेच्या आधारावर होणार आहे. पुढील वर्षापासून जीसीईटी परीक्षा बंद होणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे.

GCET
Goa Police AI Poem: गोवा पोलिसांवरील 'ही' AI जनरेटेड कविता एकदा अवश्य वाचा!

गोवा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कायमची रद्द

मागील दोन दशकांपासून सुरू असलेली राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2024 पासून घेतली जाणार नाही. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठीचे अभियांत्रिकी प्रवेश राष्ट्रीय जेईई-मेन्स परीक्षेच्या गुणांवर आधारित देण्यात येतील. तर, बी-फार्मसी प्रवेशासाठी नीट किंवा जेईई परीक्षेतील भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र (Chemistry) यांची सरासरी विचारात घेतली जाईल. असे राज्य केंद्रीय प्रवेश विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com