Sudin Dhavalikar: ..विरोधकांनी दिशाभूल केली! गोव्यात 'एक कोटी' घरांना फायदा; 'सोलर फार्म'साठी पुढाकार घेण्याचे वीजमंत्र्यांचे आवाहन

Goa Electricity Department: गावांमध्ये सोलर फार्म उभारणीसाठी लोकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज धर्मापूर येथे केले. वीजमंत्र्यांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेची माहिती दिली.

सासष्टी: गावांमध्ये सोलर फार्म उभारणीसाठी लोकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज धर्मापूर येथे केले. धर्मापूर, चिंचोणे, सारझोरा या भागांत आयटी डिस्ट्रीब्युशन नेटवर्किंगच्या पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते. ढवळीकर म्हणाले की, सोलर फार्ममुळे लोकांच्या वीजपुरवठ्याच्या अनेक समस्या सुटू शकतील. या कामी लोकांनी आमदार, स्थानिक पंचायती यांची मदत घ्यावी. सोलर फार्मसाठी वापरात नसणारी जमीन शोधून द्यावी, असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी, आपल्या मतदारसंघातील वीजपुरवठ्याच्या संदर्भातील कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी विनंती केली. तम्नार प्रकल्पाबद्दल ढवळीकर म्हणाले की, या प्रकल्पाचा अहवाल २०१४ साली जाहीर झाला होता. २०१४ ते २०२० सालापर्यंत त्यावर कोणीही आवाज उठविला नाही. २०२० साली या प्रकल्पाविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली.

४०० युनिट वीज मोफत

वीजमंत्र्यांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेची माहिती दिली. या योजनेंतर्गत घरावर सोलर प्लांटसाठी सरकार अनुदान देते. शिवाय लाभार्थीना महिन्याला ३०० ते ४०० युनिट वीज मोफत देण्यात येईल. या योजनेचा फायदा गोव्यात एक कोटी घरांना होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

विरोधकांकडून दिशाभूल

या प्रकल्पाविरोधात न्यायालयात गेलेल्यांच्या वतीने बाजू मांडताना त्यांचे ॲड. प्रशांत भूषण यांनी हा प्रकल्प सीईएस मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे आम्हाला मान्य आहे, असे सांगितले. न्यायालयानेही होकार दिला. आता हा प्रकल्प महिन्यात पूर्ण होणार. मात्र, विरोधकांनी लोकांची दिशाभूल केली आणि त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडले, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com