Tiger Reserve: पंतप्रधानांनी म्हादई अभयारण्याबाबत केलीय 'ही' घोषणा, गोव्यातील वाघांची संख्याही केली जाहीर

व्याघ्र गणना अहवाल: 20 वाघांचा वावर
Tiger
Tiger Dainik Gomantak

Tiger reserve गेल्या महिनाभरापासून राज्यात गाजत असलेल्या व्याघ्र प्रकल्प क्षेत्र आणि म्हादई अभयारण्याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली असून गोव्यात पाच वाघ असल्याचे जाहीर केले आहे.

मात्र, वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्याच्या जंगलात किमान 14 ते 20 वाघांचा वावर आहे. यामुळे उच्च न्यायालयाने व्याघ्र प्रकल्प सूचीत करण्याबाबत दिलेल्या निवाड्याला बळ मिळाले आहे.

त्यामुळे म्हादई अभयारण्य व्याघ्र राखीव क्षेत्र जाहीर करा या मागणीला पुन्हा जोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Tiger
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर गँस टँकरने घेतला पेट; वाहतूक 2 तास ठप्प

गेल्यावर्षी देशभरातील जंगलांमधून केलेल्या व्याघ्र गणनेचा अहवाल आज जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. या अहवालानुसार देशात ३ हजार ६८२ वाघ असल्याचे म्हटले आहे, तर गोव्यात २०१४ च्या गणनेनुसार ५ वाघ आहेत.

२०१८ मध्ये ही संख्या कमी होऊन ३ वर आली होती. आता नव्या अहवालानुसार पुन्हा गोव्यात ५ वाघ असल्याचे सिद्ध झाले आहे. शेजारील कर्नाटकात ५६३, तर महाराष्ट्रात ४४४ वाघ आहेत. कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील वाघांच्या संख्येत विपुल वाढ झाली आहे.

यात महाराष्ट्र पुढे आहे. कारण कर्नाटकात २०१८ साली ५२४ वरून ही संख्या ५६३ झाली, तर महाराष्ट्रात २०१८ मध्ये ३१२ वरून ही संख्या ४४४ वर पोचली आहे.

Tiger
FISU World University Games 2023 : गोव्याचा वेस्ली जागतिक विद्यापीठ स्पर्धेत सहभागी

राज्यातील म्हादई अभयारण्याला महाराष्ट्रातील तिलारी राखीव जंगल कर्नाटकातील भीमगड अभयारण्य जोडले गेले आहे, तर भगवान महावीर अभयारण्य - राष्ट्रीय उद्यान, नेत्रावळी अभयारण्य आणि खोतिगाव अभयारण्याला काळी व्याघ्र प्रकल्प जोडला आहे.

या दोन्हीही ठिकाणावरून राज्यात वाघांची मोठी ये - जा आहे, असा दावा वन विभागाने केला आहे. त्यामुळे राज्यातील जंगलांत वाघांचा मोठा वावर आहे हे स्पष्ट होते.

Tiger
Goa BJP: भाजपाचे गोवा प्रभारी सी. टी. रवींना केंद्रीय सरचिटणीसपदावरून हटविले; मुजोरी ठरली कारणीभूत

या गणनेमुळे आमच्या व्याघ्र राखीव क्षेत्राच्या मागणीला बळकटी आली आहे. आमच्या मते गोव्यात सात वाघांचा वावर आहे. मात्र, त्यातील दोन वाघ स्थलांतरित असू शकतात. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ पाहता ही वाघांची संख्या भरपूर आहे. गोवा सरकारने ताबडतोब व्याघ्र राखीव वनक्षेत्र जाहीर करावे.

- राजेंद्र केरकर, पर्यावरण अभ्यासक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com