Goa Theft: नजर चुकवत 'हाताफाई', केपेत महिलांनी 'गायब' केले 2.52 लाखांचे दागिने; CCTV मध्ये चोरट्या कैद

Quepem Crime News: सीसीटीव्ही फुटेजमध्ये या तिन्ही महिला चोरी करताना स्पष्टपणे दिसत असल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय अधिक बळावला आहे
gold stolen in Goa
gold stolen in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: दक्षिण गोव्यातील केपे येथे भरदिवसा एका दागिन्यांच्या दुकानात चोरीची घटना घडली आहे. शनिवारी (दि. २२) रोजी 'भवानी गोल्ड ज्वेलर्स' नावाच्या दुकानात तीन महिलांनी सुमारे २.५२ लाख रुपयांचे दागिने चोरून पोबारा केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या तिन्ही महिला चोरी करताना स्पष्टपणे दिसत असल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय अधिक बळावला आहे.

दुकान मालक पिंकी पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आल्या होत्या. त्याचवेळी एक ग्राहक त्यांच्या शेजारी अंगठी खरेदी करत होता. या संधीचा फायदा घेत, महिलांनी लहान मुलासाठी सोन्याच्या चेनची मागणी केली. मालकीण चेनचा ट्रे आणण्यासाठी बाजूला गेली असता, महिलांनी वर ठेवलेल्या अंगठ्याच्या ट्रेमधून दोन अंगठ्या आणि बाजूला ठेवलेल्या हारांच्या ट्रेमधून एक हार चोरला.

चोरी लक्षात येताच दुकानातील कर्मचारी सीसीटीव्ही फुटेज पाहून महिलांच्या मागावर गेले, परंतु त्या सापडल्या नाहीत. दुकान मालकांनी या घटनेची तक्रार पोलिसांत नोंदवली आहे. पिंकी पाल यांच्या म्हणण्यानुसार, या महिला गोव्यातील नसून हिंदी भाषिक आहेत.

gold stolen in Goa
Goa Theft Case: दुचाकीवरुन आले अन् मंगळसूत्र हिसकावून फरार झाले! बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेबरोबर धक्कादायक प्रकार

'भवानी गोल्ड ज्वेलर्स' शेजारील दुकानाच्या मालकानेही या घटनेची माहिती माध्यमांना दिली. चोरट्यांनी एक सोन्याची चेन, हार आणि दोन अंगठ्या चोरल्याने दुकान मालकाचे २.५२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चोरीच्या वेळी दुकानात मालकिणीसह काही कर्मचारी उपस्थित होते. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com