Goa Theft: अट्टल चोरटा कासीमच्या आणखी एका चोरीचा पर्दाफाश! पाच लाखांचे दागिने उडपीतून कोलवा पोलिसांनी केले हस्तगत

Kasim Fayaz Theft Case: अट्टल चोरटा कासीम फय्याजकडून आणखी एका चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
Kasim Fayaz Theft Case
Goa TheftDainik Gomantaki
Published on
Updated on

Notorious Thief Kasim Fayaz Gold Theft Case Solved

मडगाव: अट्टल चोरटा कासीम फय्याजकडून आणखी एका चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. त्याने चोरलेले पाच लाखांचे सुवर्णालंकार कोलवा पोलिसांनी कर्नाटकातील उडुपी येथून हस्तगत केले आहेत.

पर्यटकाचे पाच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले

कासीमने ही चोरीही वार्का येथील क्लब महिंद्रा रिसॉर्ट येथे केली होती. मागच्या वर्षी 29 डिसेंबर रोजी त्याने क्लब महिंद्रा रिसॉर्टमध्ये उतरलेल्या निवेदिथा शंकर या पर्यटकाचे पाच लाखांचे सोन्याचे दागिने त्याने लंपास केले होते. याप्रकरणी कोलवा पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात होती.

Kasim Fayaz Theft Case
Goa Gold Theft Case: सोने चोरीप्रकरणाला कलाटणी, अटकपूर्व जामिनासाठी कॅसिनो चालकाची कोर्टात धाव; वाचा नेमंक प्रकरण?

सराईत चोरटा

कासीम हा सराईत चोरटा असून तारांकित हॉटेलमध्ये उतरलेल्या पर्यटकांना (Tourists) तो सावज बनवतो. त्यांचे मौल्यवान वस्तू चोरुन नंतर त्यातून मिळालेली रोकड तो कॅसिनोमध्ये उधळतो. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने हा चोरीचा मार्ग अवलंबला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com