Goa Theft: वार्का येथून चोरीला गेलेले IAS अधिकाऱ्याचे 10 लाखांचे दागिने कर्नाटकात हस्‍तगत, कोलवा पोलिसांची कामगिरी

Verca IAS Theft Case: वार्का येथील क्लब महिंद्रा येथे उतरलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याचे दहा लाखांचे सुवर्णालंकार चोरी झालेल्‍या प्रकरणाचा कोलवा पोलिसांनी छडा लावला आहे.
Goa Crime News
Goa Theft NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Stolen gold of IAS officer recovered from Karnataka

मडगाव: वार्का येथील क्लब महिंद्रा येथे उतरलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याचे दहा लाखांचे सुवर्णालंकार चोरी झालेल्‍या प्रकरणाचा कोलवा पोलिसांनी छडा लावला असून चोरीला गेलेले दागिने कर्नाटकातील संक्लेशपुरम-मंगळूर येथून हस्तगत केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला कासीम फय्याज याने चोरीचे हे दागिने आपला मित्र एस. एम. प्रदीप याला देऊन त्याच्याकडून ८५ हजार रुपये घेतले होते असे तपासात आढळून आले आहे. 

प्रदीपला चौकशीसाठी कोलवा पोलिस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. नोएडा-उत्तरप्रदेश येथील अर्पित उपाध्याय हे तक्रारदार आहेत. ते आयएएस अधिकारी असून पत्नीसह गोव्यात फिरायला आले होते. क्लब महिंद्रा येथे ते राहिले होते. कासीम हा मूळ कर्नाटकातील उडुपी येथील आहे.

Goa Crime News
Bicholim Theft: डिचोलीतील आजाद जामा मशिदीत चोरी, दानपेटी फोडली, चोरटा सीसीटीव्हीत कैद

दागिने देऊन दुसऱ्याकडून घेतले पैसे

मागच्या वर्षी २२ ऑक्टोबरला ही चोरीची घटना घडली होती. कासीम याला त्‍या महिन्यात पोलिसांनी अटक केली होती. चौकशीवेळी त्याने चोरीची कबुली देताना आपण हे दागिने कुणाला दिले, याची माहितीही पोलिसांना दिली. आपण आर्थिक विवंचनेत असल्याचे प्रदीपला सांगून व हे दागिने आपली पत्नी व मुलीचे असल्याचे खोटे सांगून त्याच्याकडून पैसे घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com