Goa Theft: स्मार्ट सिटीत कॅमेऱ्यांची कमाल! 3.60 लाखांच्या सोनसाखळ्या चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

gold chain robbery Goa: स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे चोराची ओळख पटली आणि त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले
Goa Theft: स्मार्ट सिटीत कॅमेऱ्यांची कमाल! 3.60 लाखांच्या सोनसाखळ्या चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात
Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजधानी पणजीत घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या दोन घटनांमधील अज्ञात चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. विशेष म्हणजे, या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला होता. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे चोराची ओळख पटली आणि त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.

पर्वरी येथील रहिवासी राजेश शिरोडकर यांच्या मालकीच्या करंझाळे येथील दुकानातून २६ मार्च आणि १ एप्रिल रोजी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात व्यक्तीने तीन सोनसाखळ्या चोरल्या होत्या, ज्यामध्ये एकूण ३.६० लाख रुपये किमतीच्या १०.८०० ग्रॅम, ७.०८ ग्रॅम आणि १८.०२० ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या होत्या. याप्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यासोबतच स्मार्ट सिटीच्या देखरेख नेटवर्कने पुरवलेल्या अतिरिक्त फुटेजच्या मदतीने पोलिसांनी कसोशीने तपास करत आरोपीची ओळख पटवली.

Goa Theft: स्मार्ट सिटीत कॅमेऱ्यांची कमाल! 3.60 लाखांच्या सोनसाखळ्या चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात
Goa Theft: नजर चुकवत 'हाताफाई', केपेत महिलांनी 'गायब' केले 2.52 लाखांचे दागिने; CCTV मध्ये चोरट्या कैद

सूरज व्यंकटेश डोदमानी (वय २४, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो करंझाळे येथे भाड्याने राहत होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सूरजने दोन्ही चोऱ्यांची कबुली दिली. त्याच्या कबुलीनुसार, चोरी केलेल्या तीनही सोनसाखळ्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक महादेव पेडणेकर आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या संपूर्ण कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी सुदेश नाईक आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांचे मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोराला पकडण्यात यश आले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com