Goa Crime: नायजेरियन तरुणाच्या स्कूटरमधून निघाले 15 लाखांचे अमली पदार्थ; नागोव्यात पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक'

Nagoa crime news: अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एका नायजेरियन तरुणाला अटक केली आहे
Nagoa Police Raid
Nagoa Police RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील गुन्ह्यांवर आळा बसवण्यासाठी पोलीस कायम तत्पर असतात. राज्यातील अमली पदार्थांच्या व्यवसायावर आळा बसवण्यात पोलीस यशस्वी ठरले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एका नायजेरियन तरुणाला अटक केली आहे.

या प्रकरणात त्याच्याकडून २६.३ ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल या पदार्थाची किंमत १५ लाख रुपये होते. गोवा पोलिसांकडून ही कारवाई शुक्रवारी (११ एप्रिल) रात्री उशिरा बार्देश तालुक्यातील नागोवा येथे करण्यात आली.

रायबंदर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक विकास देयकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. सहाय्यक उपनिरीक्षक श्रीराम साळगावकर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागोवा येथील स्मशानभूमीजवळ संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय सेबास्टियन दुवा असे अटक केलेल्या नायजेरियन इसमाचे नाव आहे. तो गोव्यात नागोवा येथे भाड्याच्या खोलीत राहत होता.

Nagoa Police Raid
Goa Crime: ड्रग्ज माफिया 'अटाला'ची माहिती लपवली! फ्लॅटमालक अडचणीत; हणजूण पोलिसांत तक्रार दाखल

पोलिसांच्या या छाप्यात त्यांनी संशयितांकडून एका निळ्या रंगाच्या यामाहा फॅसिनो स्कूटरच्या डिक्कीतून गुलाबी, तपकिरी आणि केशरी रंगाच्या आयताकृती आणि त्रिकोणी आकाराच्या ६० गोळ्या (एक्स्टसी टॅब्लेट/एमडीएमए) जप्त केल्या आहेत.

या गोळ्यांचे वजन २६.३०४ ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत सुमारे १५ लाख रुपये आहे. पोलिसांनी ती स्कूटरही जप्त केली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलीस ठाण्यात नारकोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सब्सटन्स कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस शाखेचे अधीक्षक राजेश कुमार आणि आयपीएस राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेचे उपअधीक्षक विकास देयकर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com