Goa: गोव्यात आगामी काळ हा काँग्रेस पक्षाचा : दिगंबर कामत

काँग्रेस पक्षात ताकद निर्माण होत आहे. गोव्यात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तर काँग्रेस पक्षात चांगले वातावरण निर्माण झाल्याचे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यांनी कुडचडे येथे केले.
Goa: Digambar Kamat inaugurating the campaign office
Goa: Digambar Kamat inaugurating the campaign officeDainik Gomantak
Published on
Updated on

कुडचडे: काँग्रेस पक्षात (Congress party) ताकद निर्माण होत आहे. गोव्यात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तर काँग्रेस पक्षात चांगले वातावरण निर्माण झाल्याने एकाच मतदारसंघात एकापेक्षा अनेक उमेदवार निवडणूक (Election) लढविण्यासाठी पूढे येत आहे. हे आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला शुभसूचक असल्याचे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी कुडचडे (Kudchade) येथे केले. कुडचडेचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटनानंतर श्री कामत बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, पुष्कल सावंत, हर्षद गावस देसाई, अमित पाटकर, अली शेख, रजनीकांत नाईक, मनोहर नाईक, युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर इतर मान्यवर उपस्थित होते.

Goa: Digambar Kamat inaugurating the campaign office
गोवा सरकार त्वरित बरखास्त करा: कॉंग्रेस

पुढे बोलताना कामत म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने (United) कार्य केल्यास कुडचडेच नव्हे तर राज्यातही काँग्रेसची सत्ता येण्यास उशीर लागणार नाही. महापुरात (In flood) काँग्रेस पक्षाने केलेले कार्य आणि आज महापुरात सत्ताधारी करीत असलेल्या कार्याची तुलना जनता करू लागली आहे. गरिबांना मदत केल्यास देव नक्कीच मदतीला धावून येताे म्हणून आलेल्या सर्व संकटातून आपण वाचलो.

गिरीश चोडणकर म्हणाले, कुडचडे हा एकेकाळी काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ (Constituency) होता. तो परत मिळविण्याची क्षमता कुडचडेतील काँग्रेस कार्यकर्त्यांत नक्कीच आहे. सर्व हेवेदावे विसरून एकसंघ येऊन कार्य केल्यास विजय दूर नसून आगामी काळात काँग्रेस पक्षाचे सरकार आणण्यासाठी कुडचडेतून तयारी करा असे आवाहन त्यांनी केले.

बाळकृष्ण होडारकर म्हणाले, ‘जागृताय वाडोवया परिवर्तन घडोवया’ हा मंत्र घेऊन पक्ष कार्याला सुरुवात करणार असून उमेदवारी कोणाला हे महत्वाचे नसून पक्षकार्य महत्वाचे आहे. आपले कार्यालय हे मतदारसंघातील पक्ष (Party) कार्यकर्त्यांना सदैव खुले असल्याचे ते म्हणाले.

Goa: Digambar Kamat inaugurating the campaign office
Goa: वाळपई महिला काँग्रेस तर्फे गांजेत आवश्यक वस्तूंचे वितरण

भाजपला ‘पळता भुई थोडी’ होणार

बेकारी, महापुरातील लोकांचे हाल पाहता भाजपा सरकार सर्व आघाडीवर अपयशी ठरले आहे. खाण उद्योग सुरु होणार म्हणून निवडणूक काळात जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जाते. मात्र, यावेळी जनतेचा निर्धार पाहता भाजपाला ‘पळता भुई थोडी’ होणार असल्याने जनतेच्या मनातील रोष पाहून पक्षाचे कार्य केल्यास आगामी सरकार काँग्रेस पक्षाचे हे सत्य आहे. असे गिरीश चोडणकर म्हणाले.

गतवेळची चूक पुन्हा नाही

यावेळी उमेदवारी कधी जाहीर करणार असें विचारले असता, गेल्या वेळी केलेली चूक यंदा पक्ष करणार नसून किमान दोन महिने अगोदर उमेदवारी जाहीर करणार अशी तयारी पक्षाची असल्याचे दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com