pramod sawant
pramod sawantDainik Gomantak

Goa: भाजप सरकारचा महिला सबलीकरणात महत्वाचा वाटा

गृह आधार व लाडली लक्ष्मी योजनेचा (Ladli Lakshmi Yojana) फायदा राज्यातील लाखो महीला व युवतींना झाला आहे.
Published on

पिसुर्ले: गोवा मुक्ती (Liberation of Goa) नंतर सन 2012 साली प्रथमच पूर्ण स्वरूपात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने (BJP government) महीला तसेच युवतीच्या सबलीकरण करण्यासाठी उपाय योजना आखून सुरू केलेल्या गृह आधार व लाडली लक्ष्मी योजनेचा (Ladli Lakshmi Yojana) फायदा राज्यातील लाखो महीला व युवतींना झाला आहे, त्या अनुषंगाने राज्य महीला आणि बाल कल्याण संचालनालया कडून सत्तरी तालुक्यातील (Satari) सदर योजने अंतर्गत लाभ मिळत असलेल्या लाभार्थीचा आढावा घेतला असता एकूण 9039 गृहीणी तसेच 5002 युवतींनी लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ घेतला आहे.

सन 2012 पर्यंत राज्यात बऱ्याच पक्षाची सरकारे स्थापन झाली होती, परंतू त्या पैकी एकाही पक्षाच्या सरकारने वाढत्या महागाईमुळे त्रस्त बनलेल्या महीला साठी फायदेशीर अशी ठरणारी योजना अमलात आणली नव्हती, त्याच प्रमाणे वयात आलेल्या आपल्या मुलीचे लग्न किंवा तीला उच्च शिक्षणात मदत व्हावी यासाठी महीलांना गृह आधार तर 18 ते 45 वर्षे अविवाहित असलेल्या मुलींना लाडली लक्ष्मी या दोन महत्त्वाच्या अशा योजना अमलात आणल्या, त्यामुळे महीला तसेच पालक वर्गाला बराच दिलासा मिळाला आणि सदर योजनेचे स्वागत करून त्या लोकप्रिय योजना म्हणून गणल्या जाऊ लागल्या.

pramod sawant
Goa: लॅब उभारण्याची घोषणा हवेतच, चोडणकरांचा आंदोलनाचा ईशारा, तर ‘आप’कडून मागणी

त्यानुसार इतर तालुक्या प्रमाणे सत्तरी तालुक्यातील महीलांनी सुद्धा स्वागत करून सदर योजनेचा लाभ घेत आहेत, सदर योजना सुरू केल्या नंतर सरकारा समोर बऱ्याच आर्थिक अडचणी निर्माण होऊन सुद्धा आज पर्यंत तालुक्यातील 9039 महीला दर महीना या योजनेचा लाभ घेत आहे. त्याच प्रमाणे आजपर्यंत 5002 युवतींनी लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ घेतला आहे. या मध्ये गृह आधार लाभार्थी महीलाच्या बॅंक खात्यात दर महिन्याला 1500 जमा होत आहेत, तर लाडली लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत लाभार्थी युवतींना मिळाली आहे. त्यामुळे एका सत्तरी तालुक्यात दर महीना गृहीणीच्या खात्यात एक कोटी पस्तीस लाख अठ्ठावन हजार पाचशे रुपये जमा होत आहे, तर लाडली लक्ष्मी योजनेवर आतापर्यंत पन्नास कोटी दोन लाख रुपये खर्च झाले आहेत.

pramod sawant
Goa Monsoon Update: पुढील 3 ते 4 तासात जोरदार बरसणार

सरकारने सुरू केलेल्या या योजनेवर महीला, युवती, तसेच पालक वर्ग पूर्ण पणे समाधानी असून आतापर्यंत कोणत्याच राजकीय पक्षांच्या सरकारने अशा प्रकारे योजना राबविल्या नव्हत्या, त्यात सन 2012 नंतरच्या काळात सरकार समोर बऱ्याच आर्थिक अडचणी निर्माण होऊन सुद्धा गेल्या एक दशकापासून दोन्ही योजनेचा लाभ महीला व युवतींना मिळत आहे, त्यामुळे हे सरकार खरच अभिनंदनास पात्र आहे अशा प्रतिक्रिया महीला व पालक वर्गा कडून व्यक्त होताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com