War Declaration: युद्ध कसे जाहीर होते? भारतात कुणाला आहेत अधिकार? माहिती घ्या..

Sameer Panditrao

भारत आणि पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अत्युच्च टिपेला पोहोचला आहे. या वाढत्या संघर्षामुळे प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

War declaration process | Dainik Gomantak

युद्ध

युद्ध हे मोठ्या प्रमाणात होणारा,दीर्घकाळ चालणारा सशस्त्र संघर्ष असतो. संघर्ष कोणत्याही प्रकारचा असू शकतो. युद्धामध्ये एक देश दुसऱ्या देशाच्या भौगोलिक अखंडतेवर किंवा स्वायत्ततेवर हल्ला करतो.

War declaration process | Dainik Gomantak

आणीबाणी

युद्ध किंवा बाह्य आक्रमणासारख्या प्रसंगात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यासाठी भारतीय राज्यघटनेत ३५२ हे विशेष कलम लागू करण्यात येते.

War declaration process | Dainik Gomantak

राष्ट्रपती

राज्यघटनेनुसार, युद्ध जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती युद्ध जाहीर करतात.

War declaration process | Dainik Gomantak

संसद

युद्ध जाहीर करण्याचा अधिकार संसदेला नसला, तरीही या काळामध्ये सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहांना परिस्थितीची माहिती देणे आणि राजकीय एकमत तयार करणे अपेक्षित असते.

War declaration process | Dainik Gomantak

आणीबाणी

कलम ३५२नुसार, आणीबाणी लागू करण्यासाठीही संसदेची मंजुरी आवश्यक असते.

War declaration process | Dainik Gomantak

लष्करी कारवाई

रशियामध्ये अध्यक्षाला युद्ध जाहीर करण्याचा अधिकार आहे. मात्र, युक्रेन युद्धावेळी पुतीन यांनी ‘विशेष लष्करी कारवाई’ असे म्हटले होते. ब्रिटनमध्ये राजाच्या वतीने पंतप्रधान युद्धाची घोषणा करतो.

War declaration process | Dainik Gomantak
India Pakistan Border