Rajani Bhembre Passed Away : ज्येष्ठ कोकणी लेखिका रजनी भेंब्रे यांचं निधन
Rajani Bhembre Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या रजनी भेंब्रे यांचं निधन झालं आहे. त्यांनी कोकणी भाषेतील साहित्यासाठी भरीव योगदान दिलं आहे. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सावर्डे येथे ठेवलं जाणार आहे. अंत्यदर्शनानंतर त्यांच्या पार्थिवावर जांबावलीत अंत्यसंस्कार केले जातील.
रजनी भेंब्रे याचं कोकणी कथालेखिका आणि बालसाहित्यकार म्हणून मोठं नाव होतं. दक्षिण गोव्यातील कुडचडे गावात राहणाऱ्या भेंब्रे यांनी 34 वर्ष शालेय शिक्षिकेची नोकरी केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर रजनी भेंब्रे यांनी कोकणी भाषेच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं होतं.
रजनी भेंब्रे यांना मिळालेले पुरस्कार
कोकणी भाषा मंडळाचा घुस्मट कथा संग्रहाला साहित्य पुरस्कार
समाज कल्याण खात्याकडून गोवा राज्यात दिला जाणारा यशादमिनी पुरस्कार
कला आणि संस्कृती खात्याकडून दिला जाणारा कला गौरव पुरस्कार
बाल साहित्य कोकणी कला साहित्य केंद्राकडून दिला जाणारा रामनाथ मथा पुरस्कार
20 व्या अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनात बाल साहित्यावर शोध निबंधही त्यांनी सादर केला होता. लिखाणासोबतच त्यांना अभिनयाचीही आवड होती. कोकणीच्या भाषिक, साहित्यिक, सांस्कृतिक वृद्धीसाठी रजनी भेंब्रे यांनी भरीव योगदान दिलं होतं. महिला सबलीकरणासाठी आकाशवाणी पणजी आणि पणजी दूरदर्शनवर विविध कार्यकमही त्यांनी सादर केले होते.
लहान मुलांमधीस सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांना योग्य दिशा मिळावी म्हणून रजनी भेंब्रे यांनी नाटकुलीही लिहिली होती. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर 200 हून अधिक कार्यक्रमांचं सादरीकरण त्यांनी केलं होतं. कोकणी भाषा मंडळाच्या शणै गोंयबाब कथामालेच्या आयोजनात निमंत्रक म्हणून त्यांनी क्रियाशील सहभाग घेतला होता. साहित्य अकादमीच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदीही त्यांनी काम केलं आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.