Goa Strike: एकीकडे अर्थसंकल्प, दुसरीकडे आंदोलन; न्याय न मिळाल्यास टोकाचं पाऊल उचलण्याचा खासगी बस चालकांचा 'इशारा'

Private Bus Owners Goa: अर्थसंकल्प सादर होईपर्यंत ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत अशी माहिती खासगी बस चालकांनी दिलीये
Goa Bus Strike
Goa Bus StrikeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. एका बाजूने अधिवेशन सुरु असतानाच अखिल गोवा खाजगी बस चालक संघटनेचे वाहतूक परिवाहन विभागाच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. बुधवारी (दि.२६ मार्च) सादर होत असलेल्या अर्थसंकल्पामध्ये आमच्या मागण्यांसाठी तरतूद करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली होती, त्यामुळे आज अर्थसंकल्प सादर होईपर्यंत ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत अशी माहिती खासगी बस चालकांनी दिलीये.

२०१८ पासून असलेल्या प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने खासगी बसचालक सरकारवर नाराज आहेत. जर यावर्षीच्या अर्थसंकल्पात त्यांच्या मागण्यासाठी काहीच तरतूद नसेल तर अखिल गोवा खाजगी बस मालक संघटना पुढचे पाऊल उचलतील असा इशारा देखील संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी दिलाय.

Goa Bus Strike
Goa Budget 2025: माईक बदलले, स्क्रीन झळकली; गोव्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 'हायटेक'

या आंदोलनच्यावेळी सुदेश कळंगुटकर नावाच्या एका बस चालकाने माध्यमांशी संवाद साधला. खासगी बस चालकांची व्यथा सांगताना तो म्हणाला की, राज्यात सरकारने गोमंतकीयांसाठी काहीही काम ठेवलेलं नाही, दरवेळी गोव्याबाहेरची लोकं इथे येऊन व्यवसाय करतात आणि यामुळे गोवेकरांचं नुकसान होत आहे. खासगी बस व्यवसायात काही महिलांचा देखील समावेश आहे मात्र सरकार याचा विचार करत नाही.

सरकार गोमंतकियांचा अंत बघतंय

फळ-भाज्यांपासून कित्येक व्यवसाय आज बिगर गोमंतकीय करतायत आणि सरकारकडून त्यांना मदत केली जातेय. आज राज्यात इव्ही बसेस चालवण्याचं काम बिगर गोमंतकीय करतायत आणि सरकारकडून त्यांना भरपूर पैसे देखील दिले जातायत, मात्र याउलट जिथे एक गोमंतकीय अधिक पैशांची मागणी करतो तेव्हा ती फेटाळली जाते.

Goa Bus Strike
Goa Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशन! सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची कसोटी; 3 दुरुस्ती विधेयके होणार सादर

सरकार गोमंतकियांचा अंत बघतंय, फक्त बस चालकाच नाही तर प्रत्येक गोमंतकीयांनी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे. युपी आणि बिहारची लोकं पोलिसांमध्ये भरती होतायत, एखादे दिवस हीच लोकं आपल्याला बाहेर काढायला मागे बघणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केलीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com