गोव्यात अजुनही तब्बल 600 बसेसचा तुटवडा; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण...

बसेसच्या कमतरतेचा ग्रामिण भागातील कनेक्टिव्हिटीवर परिणाम
Goa Public Transport Facing Shortfall of Around 600 Buses
Goa Public Transport Facing Shortfall of Around 600 Buses Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Public Transport: राज्यात सुमारे 600 बसेसचा तुटवडा जाणवत असल्याने राज्यातील सार्वजनिक वाहतूक अत्यंत बिकट स्थितीत आहे. आजमितीस, राज्यभरात विविध मार्गांवर सुमारे 1400 खाजगी बसेस (Goa Private Buses) आणि कदंब (Kadamba) परिवहन महामंडळाच्या सुमारे 520 बसेस अशा एकूण सुमारे 1900 बसेस धावत आहेत.

(Goa Public Transport Facing Shortfall of Around 600 Buses)

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारने राज्यातील सार्वजनिक वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीतील कन्सल्टंटची नियुक्ती केली आहे. या सल्लागाराने असा अंदाज वर्तवला होता की, 2021 पर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्याला सुमारे 2500 बसेसची आवश्यकता असेल.

Goa Public Transport Facing Shortfall of Around 600 Buses
Narendra Modi Net Worth: नरेंद्र मोदींकडे किती संपत्ती आहे? पंतप्रधान म्हणून त्यांना किती पगार मिळतो? जाणून घ्या सविस्तर

म्हणजेच, राज्यात अद्यापही सुमारे 600 बसेसची तूट आहे. विशेष म्हणजे, कोविड महारोगराईनंतर अनेक खाजगी ऑपरेटर्सनी बस चालवणे बंद केले. अशांची संख्या जवळपास 30 ते 40 टक्के आहे. त्याचा आणखी ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर आला आहे.

सल्लागाराने 2021 पासून 10 वर्षांच्या कालावधीत राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या मार्गांबद्दल तपशीलवार अहवाल सादर केला होता, ज्याची सरकार अंमलबजावणी करत आहे आणि आता लोकांना सार्वजनिक वाहतुकीत येण्यासासाठी प्रोत्साहित करत आहे.

Goa Public Transport Facing Shortfall of Around 600 Buses
Goa Hospitality Institute: गोव्यात होणार हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण संस्था; पदवी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रम...

सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या माझी बस योजनेचा उद्देश खाजगी बसेस पुन्हा सुरू करणे हाच होता. राज्यातील अनेक भागात अजूनही सार्वजनिक वाहतूक पोहचलेली नाही.

राज्यातील ग्रामीण भागातील काही आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध गावांमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी बसेस सुरू करण्याच वारंवार मागणी केली, विनंती केली. तथापि, बसेसच्या कमतरतेमुळे अशा मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com