राज्य आपत्ती व्यवस्थापनाची तयारीच नाही

विजय सरदेसाईंचा हल्लाबोल: मॉन्सूनपूर्व कामे वेळेत न केल्याचाही ठपका
Goa Fire Brigade
Goa Fire BrigadeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील मुसळाधार पाऊस पडल्‍याबरोबर अनेक भागात पूरस्थितीचे प्रकार वारंवार होत आहेत, कारण सरकारची आपत्कालीन व्यवस्थापनाची योग्य तयारीच नाही. नाल्यातील गाळ उपसणे, ड्रेन मॅपिंग सारखी मॉन्सूनपूर्व कामे वेळेत होत नाहीत, आणि कामांचे लेखापरीक्षण न केल्याने ही वेळ आली आहे. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत, असा हल्लाबोल फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज विधानसभेत सरकारवर केला. पुरासंदर्भात मांडलेल्‍या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते.

(goa state is not prepared for disaster management)

Goa Fire Brigade
‘त्या’अनाथ मुलांना मोफत शिक्षण द्या : रुडाल्फ फर्नांडिस

सरकारने मोपा येथे पावासाचे पाणी साठवण्यासाठी 15 लाख रुपये खर्च करून खड्डे खोदले आहेत. परंतु, मोपा विमानतळ बांधण्यासाठी कोट्यवधी खर्च आला असून, पाणी साठवण्यासाठी मोठा आणि अनावश्‍यक निधी खर्च केला आहे. जलविज्ञानावर संशोधन करण्याची आवश्‍यकता आहे, कारण वारंवार पूरस्थितीचे प्रकार घडत आहेत, अशी सूचना सरदेसाई यांनी केली.

गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने राज्यातील अनेक भागात पाणी भरले होते. त्यात आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक पोहोचायला किमान एक दिवस लागल्याने लोकांचे हाल झाले. ही वस्तुस्थिती असून, गत घटनांकडून काही बोध घेतलेला दिसत नाही.

सरदेसाई यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापान संकेतस्थळांवर माहिती अद्यावत केली नसल्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी मान्य केले. ती दुरुस्ती करण्याचा आदेश दिल्याचेही सांगितले.

Goa Fire Brigade
‘आपद्‌ग्रस्तांना भरपाई देणार’

...तर प्रतिदिन 10 कोटींची हानी

पणजीची दिवसाला जीडीपी 10 कोटी रुपये आहे. त्यामुळे पणजी बंद पडल्यास किमान 10 कोटींचे नुकसान होते. परंतु, जास्त पाऊस पडल्यास पणजी जवळपास ठप्प होते.त्यासाठी सरकारने नियोजन करून यावर तोडगा काढण्याची आवश्‍यकता आहे.

मतदारसंघ बुडलेले ; तर यांचे भलतेच !

राज्यातील मतदारसंघ बुडलेले असताना आज मुख्यमंत्री त्याच मतदारसंघातील आमदारांना आपल्या फासात अडकवण्याचे प्रयत्न करत आहेत. याला काय म्‍हणायचे आता, कारण पावसामुळे पूरस्थितीचा लोकांना त्रास होत आहे. परंतु, सध्या भलताच प्रकार राज्यात सुरू आहे,अशी खोचक टीका आमदार सरदेसाईंनी सरकारवर केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com