‘त्या’अनाथ मुलांना मोफत शिक्षण द्या : रुडाल्फ फर्नांडिस

मेरशी जंक्शन येथे अपघातात सांताक्रूझ मतदारसंघातील अनेकांनी जीव गमावला आहे. अद्याप तिथे बसविलेली सिग्नल यंत्रणा नीट सुरू नाही.
MLA Rudolf Fernandes demands free education for orphans
MLA Rudolf Fernandes demands free education for orphans Dainik Gomantak

पणजी: मेरशी जंक्शन येथे अपघातात सांताक्रूझ मतदारसंघातील अनेकांनी जीव गमावला आहे. अद्याप तिथे बसविलेली सिग्नल यंत्रणा नीट सुरू नाही. तिथे अपघातात जीव गमावल्याने काहींचे छत्र हरपले असून अनाथ झालेल्या मुलांचा सर्व शिक्षण खर्च सरकारने करावा, अशी मागणी आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांनी सोमवारी विधानसभेत केली.

(MLA Rudolf Fernandes demands free education for orphans)

MLA Rudolf Fernandes demands free education for orphans
कुठे आहे,‘नशा मुक्त गोवा’; दिगंबर कामत यांचा सवाल

राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार मानताना त्यांनी सभागृहाला मतदारसंघातील समस्यांची माहिती दिली. मतदारंसघात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मेरशी येथील जंक्शनवर उड्डाणपूल काम रखडल्याने तिथे सतत अपघात घडत आहेत. या अपघातात अनेकांनी जीव गमावला आहे. काही मुलांचे पालक दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत, अशा मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारने उचलला पाहिजे. तसेच राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. चिंबल पठारावर असणारी 4 लाख चौ. मी. जागा अशा क्रीडा उपक्रमांसाठी ताब्यात घ्यावी. त्याठिकाणी आवश्‍यक त्या सर्व सुविधा सरकारने उभाराव्यात, असेही त्यांनी यावेळी सूचविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com