Uterine Cancer: राज्यात 'एचपीव्‍ही'मुळे दरमहा आठ महिलांना गर्भाशय कॅन्‍सर, 5 वर्षांत 527 रुग्‍ण

Cervical cancer Goa women: महिन्‍याला गर्भाशय कॅन्‍सरच्‍या आठ महिला रुग्‍ण आढळून येत असल्‍याचे केंद्रीय आरोग्‍य राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.
Uterine Cancer
Uterine CancerDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मानवी पॅपिलोमा विषाणूमुळे (एचपीव्‍ही) राज्‍यात प्रत्‍येक महिन्‍याला गर्भाशय कॅन्‍सरच्‍या आठ महिला रुग्‍ण आढळून येत असल्‍याचे केंद्रीय आरोग्‍य राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.

‘एचपीव्‍ही’ हा सामान्य संसर्गांचे एक समूह आहे. तो त्वचेवर तसेच शरीराच्या आतील भागातील ओलसर आवरणावर परिणाम करू शकतो. तोंड, घसा, जननेंद्रियाच्या भागांत आणि गुदद्वारात हा विषाणू पसरू शकतो.

Uterine Cancer
Goa Road Accident: दोन अपघातांमध्ये तिघे ठार, कुठ्ठाळीत दोघे दुचाकीस्वार तर रामनगर येथे कारचालकाचा मृत्यू

‘एचपीव्ही’चे शंभरपेक्षा अधिक प्रकार असून, काही प्रकारांमुळे विविध प्रकारच्या कॅन्‍सरचा धोका वाढतो. अशा विषाणूचा संसर्ग झाल्‍याने २०१९ ते २०२३ या पाच वर्षांच्‍या काळात राज्‍यातील ५२७ महिलांना गर्भाशयाचा कॅन्‍सर झाल्‍याचे मंत्री जाधव यांनी उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

Uterine Cancer
Goa Illegal Dance Bars: बेकायदा डान्‍स बारमुळे गोवा बँकाॅकच्या दिशेने, वेश्‍‍या व्‍यवसायाला प्रोत्‍साहन- अरुण पांडे

कधी किती रुग्‍ण आढळले

  • वर्ष रुग्‍ण

  • २०१९ १०१

  • २०२० १०४

  • २०२१ १०६

  • २०२२ १०७

  • २०२३ १०९

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com