Startup Yatra : गोव्यातील युवकांना उद्योगसंबंधी मार्गदर्शन मिळण्यासाठी 'स्टार्टअप यात्रा' फायदेशीर : खंवटे

स्टार्ट अपसंबंधी असणाऱ्या समस्यांवर उपाय काढण्यास मदत केली जाणार
Rohan khaunte | Startup Yatra
Rohan khaunte | Startup YatraDainik Gomantak
Published on
Updated on

Startup Yatra : झुआरीनगर सांकवाळ पठरावरील 'बीट्स पिलानी गोवा कॅम्पस्' ने गोव्यातील युवकांना उद्यमारंभ (स्टार्टअप) संबंधी प्रोत्साहन देण्यासंबंधी सुरू केलेल्या 'गोवा स्टार्टअप यात्रे'मुळे युवकांना उद्योगासंबंधी मार्गदर्शन मिळण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे प्रतिपादन माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी केले.

स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन समिट 2023 व नॅशनल स्टार्टअप इन्व्हेस्टर दिनाचा एक भाग म्हणून झुआरीनगर सांकवाळ पठारावरील बिट्स पिलाने के.के. बिर्ला गोवा कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री खवंटे प्रमुख पाहुणे यानात्याने बोलत होते.

Rohan khaunte | Startup Yatra
Viresh Borkar : म्हणून आमदार वीरेश बोरकर यांनी विधानसभेत मानले 'गोमंतक'चे आभार

याप्रसंगी बिट्स पिलानी गोवाचे संचालक सुमन कुंडु, प्रवीण वळवटकर, मृदुला गोयल, प्रशांत डी. राजेश जोशी आदी उपस्थित होते.

मंत्री खवंटे यांनी झेंडा दाखविल्यावर स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ झाला. सुमन कुंडु यांनी यात्रेमागील हेतू स्पष्ट केला. स्टार्टअपचा आवाहन केले. लाभ घेण्याचे खवंटे यांनी बिट्स पिलानीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

स्टार्टअपसंबंधी ज्या समस्या असतील, त्यासंबंधी योग्य उपाय काढण्यास मदत केली जाणार आहे असे सांगितले. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी 2017 मध्ये सुरु केलेल्या स्टार्टअपचा त्यांनी खास उल्लेख केला.

Rohan khaunte | Startup Yatra
Watch Video : केरळची बोट गोव्यात बुडाली, क्रू सदस्य थोडक्यात बचावले; घटनेचा थरारक व्हिडीओ पाहा

हा कार्यक्रम स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन समिट 2023 आणि राष्ट्रीय स्टार्टअप डे सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून साजरा केला जातो.

संपूर्ण कार्यक्रम स्टार्टअप प्रमोशन सेल गोवा, मायगाल्फ, - एआयसी-जआयएम, गोवा शिपयार्ड आणि बिट्स पिलानी, के के बिर्ला गोवा कॅम्पस आणि सपोर्ट पार्टनर व्हेंचर्स द्वारे प्रायोजित आहे.

बिट्स गोवा इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्रेन्योरशिप सोसायटीने त्यांचे नेटवर्क आउटरीच, ऑन-बोर्ड गुंतवणूकदार आणि समर्थित स्टार्टअप्स प्रदर्शित केले.

अथेरा, बिल्ड३, चिराते व्हेंचर्स, आयपी व्हेंचर्स, आयव्हीकॅप व्हेंचर्स, लेट्स व्हेंचर, मारवाडी एंजल्स, मुंबई एंजल्स, स्टार्टअपएक्ससीड, युनिकॉर्न व्हेंचर या कार्यक्रमात सहभागी झालेले गुंतवणूकदार भागीदार असतील.

ऑनलाइन मोडमध्ये इव्हेंटला समर्थन देणाऱ्या इतर गुंतवणूकदारांमध्ये एक्सेल चिराते वेंचर्स, 8x वेंचर्स लीड एंजल्स यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com