Viresh Borkar : म्हणून आमदार वीरेश बोरकर यांनी विधानसभेत मानले 'गोमंतक'चे आभार

जंगली जनावरांसाठी सापळे लावणाऱ्यांवर कडक कारवाई : मुख्यमंत्री
Viresh Borkar
Viresh BorkarDainik Gomantak

Viresh Borkar : दाभाळ-पाडी-केपे येथे फासात अडकवून मारलेल्या बिबट्याची दात आणि पंजे गायब असल्याच्या प्रकरणाला 'गोमन्तक'ने वाचा फोडल्याबद्दल ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर यांनी दैनिक 'गोमन्तक'चे जाहीर आभार मानत हा विषय आज शून्य प्रहरामध्ये विधानसभा पटलावर आणला.

Viresh Borkar
Atal Setu : अटल सेतूवरील धोकादायक स्टंट 'त्या' पर्यटकांना भोवणार; गुन्हा दाखल

आमदार बोरकर म्हणाले, बिबट्यांना मारण्याची ही अलीकडच्या काळातली दुसरी धक्कादायक घटना आहे. अशाप्रकारे जनावरे मारल्यास त्याचा परिणाम जैवविविधतेवर होईल. या प्रकरणात आंतरराज्य शिकारी रॅकेट असल्याचा संशय आहे. बिबट्याचे दात, पंजे आणि नखे यांना परदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे अशा परदेशी ग्राहकांसाठी अशी शिकार होत असल्याचा संशय आहे. या विषयाला वाचा फोडल्याबद्दल दैनिक ‘गोमन्तक’चे जाहीर आभार.

दरम्यान यावर मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी जंगली डुकरांसाठी अशा प्रकारचे फासे लावले जातात आणि यामध्ये बिबट्यासारखी जंगली जनावरे बळी पडतात. याविरोधात वन विभागाला सूचना दिल्या असून संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com