Professional League Football: लॉईडचे गोल ठरले निर्णायक; 'स्पोर्टिंग क्लब द गोवा'ची 'नागोवा'वर मात

विश्रांतीला तीन मिनिटे बाकी असतान अखेर स्पोर्टिंगने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली.
Professional League Football:
Professional League Football:Dainik Gomantak
Published on
Updated on

Professional League Football: लॉईड कार्दोझ याने नोंदविलेल्या दोन गोलमुळे माजी विजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने पॅक्स ऑफ नागोवा संघावर २-० फरकाने मात केली. सामना गुरुवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

लॉईडने संघाला पूर्ण तीन गुण मिळवून देताना सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल केला. पहिला गोल ४२व्या मिनिटास नोंदविल्यानंतर लॉईजने ८७व्या मिनिटास स्पोर्टिंगच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला.

स्पर्धेत थेट प्रवेश मिळालेल्या पॅक्स ऑफ नागोवाने बचावावर जास्त लक्ष केंद्रित केले, त्यामुळे स्पोर्टिंगच्या आक्रमक खेळाडूंना जास्त मोकळीक मिळाली नाही.

Professional League Football:
Goa Molestation Case: गोवा विद्यापीठातील प्राध्यापकाकडून विनयभंग, महिला पोलिस स्थानकात गुन्हा नोंद

विश्रांतीला तीन मिनिटे बाकी असतान अखेर स्पोर्टिंगने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. आयव्हन कॉस्ता याचा सणसणीत फटका अगोदर नागोवाचा गोलरक्षक ओझेन सिल्वा याने रोखला, पण तो चेंडूवर ताबा राखू शकला नाही.

त्याचा लाभ उठवत रिबाऊंडवर लॉईडने अचूक लक्ष्य साधले. उत्तरार्धात आक्रमक खेळाचे क्वचितच दर्शन घडले, परिणामी चेंडू जास्त काळ मैदानाच्या मध्यास राहिला. लॉईडला गोल करण्याची एक संधी उपलब्ध झाली.

Professional League Football:
Bicholim Mine: बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी डिचोली पोलीसांची कारवाई, 4 संशयित ताब्यात

मात्र त्याचा मैदानी फटका गोलरक्षक ओझेन सिल्वा याने व्यवस्थित अडविला. मात्र सामन्यातील तीन मिनिटे बाकी असताना लॉईडच्या फटक्यासमोर गोलरक्षक ओझेन हतबल ठरला.

स्पर्धेत शुक्रवारी (ता. 1) म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब व वास्को स्पोर्टस क्लब यांच्यात सामना होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com