Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Molestation Case: गोवा विद्यापीठातील प्राध्यापकाकडून विनयभंग, महिला पोलिस स्थानकात गुन्हा नोंद

Goa University Molestation Case पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी महिला पोलिस स्थानकात काल गोवा विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
Published on

Goa University Molestation Case गोवा विद्यापीठातील वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावून तिचा विनयभंग व लैंगिक छळ केल्याप्रकरणी सहाय्यक प्राध्यापकाविरोधात महिला पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी त्याच्या निवासी पत्त्यावर नोटीसवजा समन्स बजावून उद्या १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. महिला पोलिस स्थानकात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी महिला पोलिस स्थानकात काल गोवा विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Goa Crime News
Serendipity Arts Festival: सेरेंडिपिटी सार्वजनिक कला प्रकल्पांसाठी प्रस्ताव मागवण्यात सुरुवात

या प्राध्यापकाने विद्यार्थिनीला आपल्या केबिनमध्ये बोलावले व तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. या घटनेने भयभीत झालेल्या विद्यार्थिनीने ही घटना पालकांना सांगितली होती. पालकांनी यासंदर्भात गोवा विद्यापीठाच्या निबंधकांकडे तक्रार दाखल केली होती मात्र विद्यापीठाकडून काहीच कारवाई झाली नाही.

त्यामुळे विद्यार्थिनीच्या वडिलांनी या घटनेची माहिती एका आमदाराशी संपर्क साधून दिली. या आमदाराने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून गोवा विद्यापीठाकडून चौकशीस होत असलेल्या नाकार्थीपणाबद्दल माहिती दिली.

Goa Crime News
Goa School Girl Molestation: ‘त्‍या’ पीई शिक्षकाकडून यापूर्वीही दोन ठिकाणी विनयभंगाचे प्रयत्न

ही घटना संवेदनशील असल्याने मुख्यमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करत पोलिस प्रमुखांशी संपर्क साधून प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनीचे वडील या घटनेनंतर त्वरित तक्रार देण्यास पोलिस स्थानकात आले नाहीत.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामार्फत त्यांनी पोलिस स्थानकात तक्रार घेऊन आले. त्यांची तक्रार कालच घेऊन एनजीओच्या मदतीने पीडित विद्यार्थिनीची जबानी नोंद करण्यात आली आहे.

सहाय्यक प्राध्यापकाविरुद्ध भादंसंच्या कलम ३५६ व ३५६अ खाली गुन्हा नोंद झाला आहे. आज त्याना कायद्यातील कलम ४१ नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. या चौकशीला ते उपस्थित न राहिल्यास पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती तपास करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com