Bicholim Mine
Bicholim MineDainik Gomantak

Bicholim Mine: बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी डिचोली पोलीसांची कारवाई, 4 संशयित ताब्यात

सदर काम संबंधित प्राधिकरणांची कोणतीही परवानगी न घेता सुरु असल्याचे समोर आले.
Published on

Bicholim Mine: बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी 4 व्यक्तींना अटक केल्याची घटना आज 31ऑगस्ट रोजी घडली. सदरची कारवाई डिचोली पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आली असून मये येथे खदानीच्या खड्ड्यांतून बेकायदेशीरपणे लॅटराईट दगड काढताना आणि ते लोड करताना रंगेहात पकडण्यात आले.

Bicholim Mine
Goa School Girl Molestation: ‘त्‍या’ पीई शिक्षकाकडून यापूर्वीही दोन ठिकाणी विनयभंगाचे प्रयत्न

या संबंधी सविस्तर वृत्त असे की, डिचोली मये तलावाजवळ संदीप जोवारी लकारा, महाबीर राम, लालदेव राम, अमर तुयेकर आणि ट्रक चालक मुकुंद केरकर हे खदानीच्या खड्ड्यांतून लॅटराईट दगड काढताना आणि ते लोड करताना आढळून आले.

त्यावेळी संबंधितांकडे चौकशी केली असता ते काम संबंधित प्राधिकरणांची कोणतीही परवानगी न घेता सुरु असल्याचे समोर आले.

Bicholim Mine
Goa Molestation Case: गोवा विद्यापीठातील प्राध्यापकाकडून विनयभंग, महिला पोलिस स्थानकात गुन्हा नोंद

त्यामुळे सदर व्यक्तींवर डिचोली पोलिसांनी कारवाई करत खोदाई करण्यासाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रिक कटिंग मशीन, मशीन ब्लेड, दोन जनरेटर, एक विद्युत मोटर असलेला पॉवर टिलर आदी साहित्य ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com