Goa Fish Market: गोव्यात सुकी मासळीही खातेय भाव; गोवेकरांची प्रचंड मागणी!

Goa Fish Market: गोव्यात जशी ताजी मासळी प्रसिद्ध आहे, तशीच सुक्‍या मासळीलाही मोठी मागणी आहे.
Goa Fish Market
Goa Fish MarketDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Fish Market: गोमंतकीयांचे मुख्य जेवण म्हणजे शीत-कडी. कडी कसली तर मासळीची. गोव्यात जशी ताजी मासळी प्रसिद्ध आहे, तशीच सुक्‍या मासळीलाही मोठी मागणी आहे. ताजी मासळी मिळाली नाही तर गोवेकर सुक्या मासळीवर ताव मारतात.

दरम्यान, अलीकडे सुकी मासळी तयार करण्याचे प्रमाण कमी होत आहे. काही कुटुंबे जिद्दीने हा व्यवसाय करतात. त्यामुळे सुकी मासळी उपलब्ध होते. हा त्यांचा व्यवसाय टिकला पाहिजे. त्यासाठी सरकारची मदत हवी, असे या व्यावयासायिकांचे मत आहे.

Goa Fish Market
Goa Program: कार्यक्रम मंदिराचा, अन् चर्चा मात्र आयआयटीची!

पूर्वी सुक्या मासळीचा लोक पुरुमेंत करायचे. पावसाळ्यापूर्वी जेथे फेस्त भरते, तेथे सुकी मासळी विकत घ्यायला लोकांची झुंबड उडायची. सुक्‍या मासळीत सर्वांत लोकप्रिय आणि चवदार असतो तो बांगडा व सुंगटे. या दोन्ही मासळीची कडी, किसमूर किंवा भाजून त्यावर खोबरेल तेल वगैरे घालून खाता येते.

बोंबिल, मोरी, पेडवे, धोडयारेसुद्धा सुकवल्यानंतर खायला मस्‍त लागतात. पूर्वी सुकी मासळी केवळ एप्रिल-मे महिन्यात उपलब्ध असायची. पण आता वर्षभर ती बाजारात मिळते. त्यामुळेच की काय सुक्या मासळीचे आकर्षण लोकांमध्ये कमी झाले आहे.

Goa Fish Market
Goa Crime Case: टारझन पार्सेकरवर 'रासुका'खाली कारवाई!

दक्षिणेत 50 कुटुंबांचा व्यवसाय: दक्षिण गोव्‍यातील कोलवा, बाणावली, केळशी या भागात सुकी मासळी जास्त प्रमाणात उपलब्ध असते. या परिसरातील कमीत कमी 50 कुटुंबे या व्‍यवसायावर आपली उदरनिर्वाह चालवतात.

कोलव्यात सुकी मासळी मिळण्याचे खास ठिकाण आहे. तिथे झोपड्या आहेत, जिथे सुकी मासळी एकत्र करून ठेवली जाते. हे लोक पावसाळ्‍यानंतर म्‍हणजे ऑक्‍टोबरपासूनच सुकी मासळी तयार करतात.

Goa Fish Market
Assagao: आसगाव पठार कचऱ्याच्या विळख्यात; नागरिक संतापले

मासळीविक्रेती-

हा आमचा पारंपरिक धंदा आहे. मी पाच वर्षांची असल्‍यापासून कुटुंबातील वडीलधाऱ्यांसमवेत मासळी सुकत घालायला मदत करायची. प्रथम ताज्या मासळीतील पाणी काढून घेतले जाते. नंतर ही मासळी मिठात घातली जाते. त्‍यानंतर कमीत कमी तीन आठवडे ती उन्‍हात सुकविली जाते. हा व्‍यवसाय फार कष्‍टाचा असला तरी आता अंगळवणी पडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com