Goa News: 'दाबोळी'चे पंख छाटू नका! दक्षिण गोव्‍यातील व्यावसायिकांची मागणी

Goa News: दाबोळी विमानतळ बंद करण्‍याच्‍या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Goa News | Dabolim Airport
Goa News | Dabolim Airport Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: दक्षिण गोव्‍यातील लोकांसाठी वरदान ठरलेला दाबोळी विमानतळ बंद करण्‍याच्‍या दिशेने सरकारचे एकेक पाऊल पुढे पडत आहे. त्‍यामुळे पर्यटन व्‍यवसायावर अवलंबून असलेल्‍या तेथील लाखो लोकांच्‍या पोटात भीतीचा गोळा निर्माण झाला आहे. कोरोनातून सावरत असतानाच आता ही अत्‍यंत क्‍लेषदायक बातमी कानावर येत आहे. त्‍यामुळे अगोदरच कर्जात बुडालेल्‍या या लोकांचा पाय आणखी खोलात सापडणार आहे.

युवा व्यावसायिक निराश होतील; चंदन धुरी, टॅक्सी ओनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष-

दाबोळी विमानतळावर उतरणारी आंतरराष्ट्रीय विमाने मोपाकडे वळविल्‍यास काणकोणमधील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडेल. तालुक्‍यातील किनारी पर्यटन व्यवसायाला मरगळ येऊन या व्यवसायात नव्यानेच उतरलेल्या विशेषत: युवा व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे.

महाराष्ट्रात चुकीच्या धोरणामुळे शेकडो शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली व करीत आहेत. याची पुनरावृत्ती भाजप सरकार दक्षिण गोव्‍यात करू पाहत आहे की काय? टॅक्सीचालकांवरही उपासमारीची वेळ येईल.

Goa News | Dabolim Airport
Goa News: मोपा’चा फायदा कोणाला? 'खरी कुजबुज'

अगोदर पायाभूत सुविधा तयार करा; पंकज नाईक गावकर, पर्यटन व्यावसायिक-

सध्‍या काणकोणात पर्यटन व्‍यवसाय मरगळलेला आहे. गुंतवणुकीचा परतावा मिळणे कठीण बनले आहे. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे मोपा विमानतळावरून काणकोणातील पाळोळे, आगोंद किनाऱ्यावर येण्यास किमान चार ते साडेचार हजार रुपये टॅक्सी भाडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे पर्यटक काणकोणमधील किनाऱ्यांकडे पाठ फिरवून उत्तर गोव्यातील किनाऱ्यांना पसंती देतील. पेडणे ते काणकोणपर्यंत रोड नेटवर्क व अन्य पायाभूत सुविधा प्रथम विकसित केल्‍या पाहिजेत, जेणेकरून पर्यटक दक्षिणेतही येतील.

सरकारने गांभीर्याने विचार करावा; सायमन रिबेलो, माजी नगराध्यक्ष तथा पर्यटन व्यावसायिक पाळोळे

आंतरराष्ट्रीय विमाने मोपा विमानतळावर उतरल्यास काणकोणातील पर्यटन व्यवसाय नेस्तनाबूद होणार आहे. किमान देशी विमाने तरी दाबोळी विमानतळावर उतरली पाहिजेत. तालुक्‍यातील किनारी पर्यटन व्यवसायाला परदेशी पर्यटकांमुळे बळकटी मिळत होती.

मात्र आता हे पर्यटकच मोपा विमानतळामुळे उत्तर गोव्याकडे जाणार आहेत. त्‍यामुळे येथील पर्यटन व्यावसायिकांची भिस्त देशी पर्यटकांवरच असेल. अनेकांनावर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्‍यामुळे सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा.

Goa News | Dabolim Airport
Goa News: पोलिसांना काळ्या काचा दिसत नाहीत का? 'खरी कुजबुज'

व्यावसायिक देशोधडीला लागतील; पेले फर्नांडिस, कोलवा येथील जलक्रीडा व्यावसायिक-

दक्षिण गोव्यातील व्यवसायिक मुख्‍यत: दोन व्यवसायांवर अवलंबून आहेत. एक म्हणजे पारंपरिक मच्छीमारी व्यवसाय व दुसरा म्‍हणजे पर्यटन व्यवसाय. सध्या मोठ्या बोटींद्वारे एलईडी मासेमारी मोठ्या प्रमाणात करण्‍यात येत असल्‍याने पारंपरिक मच्‍छीमारांना मासळी मिळणे कठीण झाले आहेत.

त्‍यामुळे त्‍यांना आपल्‍या उदरनिर्वाहाचा प्रश्‍‍न सतावू लागला आहे. आता दाबोळी विमानतळ बंद झाल्यास या व्यावसायिकांच्या हातातील पर्यटन व्यवसायही जाईल. अशाने दक्षिण गोव्यातील व्यावसायिक देशोधडीला लागतील.

लाखो लोक बेरोजगार होतील; फा. एरेमित रिबेलो, निमंत्रक, गोवन्स फॉर दाबोलीम ओन्ली-

या सरकारला लोकांना रोजगार देता येत नाही. सरकारी नोकऱ्या फक्त मंत्र्यांच्‍या जवळच्‍या लोकांना मिळतात. अशा परिस्‍थितीत दक्षिण गोव्यात लाखो लोक फक्त पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. प्रश्न फक्त हॉटेल्‍सचालक आणि टॅक्सीचालकांचा नाहीय.

इतर हजारो लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. दाबोळी विमानतळ बंद झाल्यास दक्षिण गोव्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प होईल आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचा रोजगार जाईल. पण सरकारला त्याचे काहीच पडलेले नाही.

Goa News | Dabolim Airport
Goa Accident Cases: गोव्यातील फर्मागुढी-भोम प्रवास ठरतोय जीवघेणा!

हॉटेल्स व्यावसायिकांच्‍या पोटावर पाय; शेराफिन कोता, लहान व मध्यम हॉटेल्समालक संघटनेचे माजी अध्यक्ष-

एकदा मोपा विमानतळ सुरू झाला की दक्षिण गोव्‍यातील दाबोळी विमानतळ बंद होणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे. दक्षिण गोव्यात अशी शेकडो लहान आणि मध्यम हॉटेल्स आहेत, जी फक्त विदेशी चार्टर विमानांतून येणाऱ्या पर्यटकांवर चालतात.

ही आंतरराष्‍ट्रीय विमाने मोपावर उतरल्यास दक्षिण गोव्‍यात येणारा पर्यटक उत्तर गोव्यातील किंवा महाराष्ट्रातील हॉटेल्समध्ये जाणार. ज्याचा फटका दक्षिण गोव्यातील हॉटेल्स व्यावसायिकांना बसणार आहे. तसेच या व्‍यवसायावर अवलंबून असलेल्‍या अनेकांची रोजीरोटी जाणार आहे.

...तर पर्यटक दक्षिणेत येतीलच कशाला? नीलेश गुरव-

दाबोळी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने येण्यास बंद झाल्यास त्‍याचा जबर फटका टॅक्सीव्यावसायिकांना बसणार आहे. मोपा विमानतळ गोव्याचा दुसऱ्या टोकाला असल्याने जर एखादा पर्यटक केपेहून मोपा येथे टॅक्सीने जाणार असेल, तर त्याला किमान तीन-साडेतीन हजार रुपये भाडे द्यावे लागेल.

Goa News | Dabolim Airport
Goa News: वीज सुविधांसाठी 711 कोटींच्या कामाला मंजुरी- सुदिन ढवळीकर

साहजिकच ते त्याला परवडणारे नाही. त्‍यामुळे पर्यटक थेट मोपावर उतरतील. नंतर ते दक्षिण गोव्‍यात येण्‍याची शक्‍यता खूपच कमी असेल. कारण तेथूनच ते रेल्वेने मुंबईला जाऊन विमान पकडू शकतात. दक्षिणेतील टॅक्सीव्यवसाय कोलमडून पडेल.

खरी कसोटी टॅक्‍सीव्‍यावसायिकांचीच! नेतन मडगावकर-

राज्य सरकारने दोन्ही विमानतळ चालू ठेवणार असल्याचे सांगितले आहे. पण दाबोळी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने उतरणार नसतील तर त्‍याचा फटका पर्यटन व्‍यवसायाबरोबरच टॅक्सीचालकांना बसणार आहे. या भागातील बरेच लोक आखाती देशात व जहाजावर कामाला असून त्यांना दाबोळी विमानतळ जवळचा आहे. ते इथे उतरतात.

पण तसे न झाल्यास मोपा विमानतळावर उतरण्यापेक्षा ते मुंबईला उतरून बस किंवा रेल्वेद्वारे गोव्यात येऊ शकतात. ते त्यांना फायदेशीरसुद्धा ठरणार असल्याने टॅक्सीव्‍यवसाय बंदच पडेल.

कर्जाच्‍या ओझ्‍याखाली दबून जाऊ; नीलेश नाईक, गोवा माईल्‍स चालक-

आम्ही ‘गोवा माईल्स’वर विश्वास ठेवून टॅक्सी व्यवसायात उतरलो होतो. पण याचा फटका आता आम्हाला बसत आहे. त्यातच दाबोळी विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानांसाठी बंद केल्यास हा व्‍यवसायच पूर्णत: कोलमडून पडेल. दोन वर्षे कोविड महामारीत गेली.

अगोदरच आमच्यावर कर्जाचा बाजा झाला आहे. त्‍यात आता आणखी भर पडणार आहे. दक्षिण गोव्यातील बऱ्याच ठिकाणी गोवा माईल्सच्या टॅक्सीचालकांना व्यवसाय करण्यापासून दूर ठेवले जात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या गावातील लोकांना सेवा देत आहोत.

Goa News | Dabolim Airport
Goa Accident: कोठार्लीत दुचाकीचा अपघात; ट्रकखाली आल्याने युवक जागीच ठार!

मोपाबरोबरच ‘दाबोळी’ही सुरू रहावा; क्रुझ कार्दोझ, अध्यक्ष अखिल गोवा शॅकमालक कल्याण संघटना-

मोपा विमानतळ पर्यटन व्‍यवसाय विकासाच्या दृष्टीने होत असल्यास चांगलेच आहे. याचबरोबर दक्षिण गोव्याला जोडणारा चौपदरी रस्ताही महत्वाचा आहे आणि तो पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे मोपा विमानतळवर सहज जाता येईल.

मात्र दाबोळी विमानतळही सुरू राहणे तितकेच गरजेचे आहे. हा विमानतळ बंद केल्यास येथील पर्यटन व्यवसायावर विपरित परिणाम होणार होऊन दक्षिण गोव्यातील अनेक व्यवसाय ठप्प पडणार आहेत दक्षिण गोव्‍याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.

उदरनिर्वाह चालविणे कठीण होईल; विकी कवठणकर, मडगाव टुरिस्ट टॅक्सीचालक-

दाबोळी विनामतळ हा दक्षिण गोव्यातील पर्यटन व्यवसायाचा आर्थिक कणा आहे. उत्तर गोव्यातील मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दक्षिण गोव्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडणार आहे. सध्या दाबोळी विमानतळ कार्यरत असला तरी येथून अधिक पर्यटक उत्तर गोव्याच्या दिशेने जातात.

आताच ही परिस्थिती आहे तर मोपा कार्यरत झाल्यानंतर ती आणखी बिघडणार आहे. दक्षिण गोव्यात विदेशी पर्यटक कमीच येतात. दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक येथील देशी पर्यटकांवर या परिसराची मदार अवलंबून आहे, तेही उत्तर गोव्‍यात जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com