Goa Accident Cases: गोव्यातील फर्मागुढी-भोम प्रवास ठरतोय जीवघेणा!

Goa Accident Cases: गोवा राज्यात रस्तेअपघात प्रचंड वाढले असून त्‍यात अनेकांचे बळी जात आहेत.
Goa Accident Cases
Goa Accident CasesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Cases: राज्यात रस्तेअपघात प्रचंड वाढले असून त्‍यात अनेकांचे बळी जात आहेत. आता हे अपघात रस्ते खराब असल्यामुळे होतात की चालक दारू पिऊन वाहने चालविण्याच्या प्रकारामुळे होतात हा वाद असला तरी बळींची संख्‍या वाढलीय, ही वस्‍तुस्‍थिती नाकारून चालणार नाही. विशेष म्‍हणजे यात निष्पाप लोकांचेही बळी जात आहेत.

फोंडा तालुक्यात तर अनेक ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रे आहेत. त्यात प्रामुख्याने फर्मागुढी ते भोम-बाणस्तारीपर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे. फर्मागुढीपासून सुरू होणारा हा धोकादायक प्रवास भोमपर्यंत संपतो. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे बनले आहे.

Goa Accident Cases
Goa News: वीज सुविधांसाठी 711 कोटींच्या कामाला मंजुरी- सुदिन ढवळीकर

राज्य चौपदरी रस्ता मोहिमेअंतर्गत खांडेपार ते कुर्टीपर्यंतचा रस्ता रुंद करण्यात आला आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी उड्डाणपूलही बांधण्यात आले आहेत. वास्तविक फर्मागुढी ते बाणस्तारी रस्ता चौपदरीकरण करण्याबरोबरच बाणस्तारीचा पूलही चौपदरी करण्याचा प्रस्ताव आहे.

कागदोपत्री सोपस्कार बहुतांश पूर्ण झालेले आहेत. मात्र प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. हा रस्ता अजूनही अरुंद असल्याने वाढत्या वाहतुकीचा ताण त्‍यावर पडत आहे. त्यातच बेदरकार वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. यावर उतारा म्हणजे फर्मागुढी ते भोम-बाणस्तारीपर्यंतच्‍या रस्‍त्‍याचे शक्य तेवढ्या लवकर रुंदीकरण करणे गरजेचे बनले आहे.

काय आहे समस्या...

फर्मागुढी ते कोने-प्रियोळ व पुढे कुंडई-भोम-बाणस्तारीपर्यंतचा रस्ता काही ठिकाणी रुंदीकरण केला असला तरी बहुतांश ठिकाणी अजून रुंदीकरण आवश्‍यक आहे. फक्त म्हार्दोळ ते कुंडईपर्यंत हा रस्ता रूंद झाला आहे.

Goa Accident Cases
Goa Government: 'गोवा टॅक्सी'द्वारे टॅक्सीमालकांना 90 टक्के भाडे- माविन गुदिन्हो

अन्यथा आहे त्याच स्थितीत या रस्त्याचा वापर होत आहे. काही महिन्यांपूर्वी फर्मागुढीपासून म्हार्दोळपर्यंत रस्त्याच्या कडा वाढविण्याचा प्रयत्न झाला होता. खरे म्हणजे या रस्‍त्‍याचे चौपदरीकरण करणेच योग्य आहे. कोने-प्रियोळ भागात तर एका बाजूला डोंगर कपारी तर दुसऱ्या बाजूला दरी असा प्रकार आहे. त्यातच झाडे वाढलेली आहेत.

भोम रस्त्याचे भिजत घोंगडे

कुंडई ते बाणस्तारीदरम्यान भोम भागात गावातून रस्ता गेला असल्याने या ठिकाणी दुतर्फा दुकाने तसेच घरे आहेत. त्यामुळे या अरुंद रस्त्यावर कायम अपघात व वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी चौपदरी रस्ता रुंदीकरण योजना राबवताना एक तर गावातील शेतीच्या बाजूने किंवा गावाच्या वरच्या बाजूने डोंगर भागाकडून रस्ता रुंदीकरण करणे शक्य आहे.

Goa Accident Cases
Goa Politics: पंतप्रधानांना पत्र लिहिणे, हा केवळ प्रसिद्धीचा 'स्टंट'

नपेक्षा उड्डाणपुलाच्या माध्यमातून चौपदरी रस्त्याची उभारणीही शक्य आहे. सध्या गावातून चौपदरी रस्ता करण्यास स्थानिकांचा विरोध असल्याने त्यांना विश्‍वासात घेऊन पुढील कार्यवाही केली पाहिजे.

वर्षभरात सहाजणांचा बळी

गेल्या वर्षभरात फर्मागुढी ते भोमपर्यंतच्या रस्त्यावर सहा बळी गेले आहेत. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अपघातांचा आकडा मोठा असला तरी बऱ्याचदा अपघात झाल्यानंतर दोन्ही वाहनचालकांकडून सामंजस्याने वाहने हटविली जातात आणि पोलिसांत तक्रार नोंदवली जात नाही.

मात्र जास्त नुकसानी अथवा एखादा बळी गेल्यानंतर मात्र पोलिसांत नोंद होते. त्यावेळी हटकून या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झालेली असते. ही वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची बरीच दमछाक होते.

Goa Accident Cases
Goa News: नोंदणी शुल्‍कासाठी 3 जेटींवर टाळे; अन् तासांभरात काढलेही!

काय करता येईल?

  • नवीन चौपदरी रस्ता योजना त्वरित मार्गी लावायला हवी.

  • डोंगर कपारी कापून रस्‍त्‍यांचे रुंदीकरण करणे गरजेचे.

  • रस्त्याच्या बाजूच्‍या गाड्यांचे अगोदर पुनर्वसन करणे.

  • भोम येथील रस्त्याबाबत योग्य तोडगा काढणे.

  •  धोकादायक वळणे कापून रस्‍ता सरळमार्गी करणे.

  • आवश्‍यक तेथे गतिरोधक, दिशादर्शक फलक गरजेचे.

हनुमंत नाईक, दुर्भाट-

फर्मागुढी ते भोमपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण हाती घेण्याची गरज आहे. या रस्त्यावरील अपघातात लोकांचे बळी जात असल्याने ते महत्त्वाचे आहे.

रामदास हळदणकर, फोंडा-

राज्यात बऱ्याच ठिकाणी चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे फर्मागुढी ते भोमपर्यंतच्या रस्त्याचेही रुंदीकरण प्राधान्यक्रमाने हाती घ्‍यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com