Road Issue In Goa : सोनाळ, तार, कडतरी गावचा रस्ता उंच करण्याची होतेय मागणी; 'या' समस्येमुळे ग्रामस्थ झालेत हैराण

पूरावेळी तुटतो तीन गावांचा संपर्क
Road Issue
Road IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi Road Issue: सावर्डे पंचायत क्षेत्रातील सोनाळ, तार, कडतरी हे तीन गाव म्हादई नदीच्या काठावर वसले आहे, मात्र नदीला पूर आल्यावर येथील रस्ता पाण्याखाली जात असल्याने गावांचा संपर्क तुटतो.

या रस्त्याची उंची कमी असल्याने ही समस्या निर्माण होते, त्यामुळे या रस्त्याची उंची वाढवण्यात यावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.

२०२१ साली पुरामुळे सलग दहा दिवस सोनाळ, कडतरी गावाचा संपर्क तुटला होता. त्यामुळे नागरिकांना बराच मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतरही अनेकदा लोकांना याचा फटका बसला आहे.

त्यामुळे या रस्त्याची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी लोक करीत आहे. तसेच म्हादई नदीचा काठ संरक्षक भिंत उभारून सुरक्षित करावा, अशीही लोकांची मागणी आहे.

रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे गावातील विद्यार्थी, नोकरदार यांचे बरेच हाल होतात. दोन वर्षांआधी म्हादईला पूर आल्याने दहा दिवस लोक गावातच अडकले होते. अशावेळी शाळा, महाविद्यालयातून येत असलेल्या मुलांना गावात पोचता येत नाही, अशी स्थिती अनेकवेळा निर्माण होते. यासाठी येथील रस्त्याची उंची वाढवणे आवश्‍यक आहे.

- चंद्रकांत गावकर, सोनाळ

Road Issue
Fatorda Stadium: ट्रॅकला भेगा, क्रिकेटची खेळपट्टी, फुटबॉलची जाळी खराब; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेअगोदर विदारक चित्र समोर

सरकारने पर्यायी मार्ग करून दिला पाहिजे. सोनाळ ते धावे गावात जाणारा कच्चा मार्ग आहे. पूर्वापार लोक या मार्गाचा वापर करतात. हा रस्ता करून दिल्यास धावे गावातून वाळपईत जाता येणार आहे. तसेच तार सोनाळ रस्ता म्हादई नदीच्या अगदी काठावर आहे. तो उंच केला पाहिजे.

- कृष्णा नेने, सोनाळ

Road Issue
Goa Borim Bridge: 37 वर्षे जुना बोरी पूल धोकादायक; पर्यायी पूल उभारण्याची पंचायतीची मागणी

सोनाळ तार येथे पावसाळ्यात नेहमीचीच समस्या निर्माण होते. दोन वर्षा अगोदर पाणी आपल्या घरापर्यंत येऊन अर्धे घर बुडाले होते. हा रस्ता अगदी नदीच्या बाजूलाच आहे. त्यामुळे सरकारने या भागात खांब घालून रस्ता केला पाहिजे. तसेच पर्यायी मार्गही केला पाहिजे.

- परेश काळे, सोनाळ

सोनाळ तार या भागात नदीच्या किनारी भागात बागायती आहे. ही बागायती पुरावेळी पाण्यात जाते. तसेच हा रस्ता अगदी सखल भागात आहे. त्यामळे नदीचे पाणी मोठ्या पावसावेळी रस्त्यावर येऊन तुंबते. न रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते. ही समस्या सुटण्यासाठी रस्ता उंच करणे आवश्यक आहे.

- अर्जुन गावकर, सोनाळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com