Smart Meter Controversy: वाढीव बिले तत्‍काळ माफ करा, दंडही रद्द करून अधिसूचना जारी करा; 'आप'ची सरकारकडे मागणी

Goa Smart Meter Controversy: राज्यातील ग्राहकांवर लादण्यात आलेली वाढीव वीजबिले आणि दंड तात्काळ व अधिकृतरीत्या माफ करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
Smart meter bill issue latest news
AAP demands waiver of increased electricity bills in smart meter controversyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: राज्यातील ग्राहकांवर लादण्यात आलेली वाढीव वीजबिले आणि दंड तात्काळ व अधिकृतरीत्या माफ करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

पक्षाचे उपाध्यक्ष रॉक मास्कारेन्हस आणि संघटन सचिव प्रशांत नाईक यांनी मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर टीका केली. वाढीव वीजबिलांच्या प्रश्नावर सरकारकडून स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रभावित ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने अधिकृत अधिसूचना जारी करून वाढीव बिले आणि दंड रद्द करावा, अशी मागणी केली.

Smart meter bill issue latest news
Goa Road Accidents: बेफाम वेगाचे चार बळी, रविवारी चार ठिकाणी रस्‍ते अपघात; साडेपाच महिन्‍यांत 116 जणांचा मृत्‍यू

रॉक मास्कारेन्हस यांनी सांगितले की, वाढीव वीजबिलांचा प्रश्न आता राज्यव्यापी बनला आहे. वीजमंत्र्यांच्या निवासस्थानावर काढलेल्या मोर्चावेळी ‘आप’ने सर्व वाढीव बिले माफ करण्यासह ग्राहकांना सॅंक्शन्ड लोड वाढविण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्याची मागणी केली होती.

प्रशांत नाईक यांनी वाढीव वीजबिलांमुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडल्‍याचा आरोप केला. राज्यभरातून या प्रश्नावर संताप व्यक्त होत असतानाही सरकारकडून गोंधळ निर्माण करणारी विधाने केली जात असल्याचे ते म्हणाले.

Smart meter bill issue latest news
Goa Politics: आप कार्यकर्त्यांनी फोंड्यात मगोपला दाखविले काळे झेंडे, शाब्दिक चकमक; काही काळ तणावाचे वातावरण

स्मार्ट मीटर प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

८९० कोटी रुपयांच्या स्मार्ट मीटर प्रकल्पावरही ‘आप’ने प्रश्न उपस्थित केले. या प्रकल्पामुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, असा दावा करत सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी पक्षाच्‍या नेत्यांनी केली.

अशा आहेत प्रमुख मागण्‍या

सर्व वाढीव वीजबिले तत्काळ माफ करावीत

ग्राहकांवरील दंड पूर्णपणे रद्द करावा

वीज खात्याने अधिकृत अधिसूचना जारी करावी

सॅंक्शन्ड लोड वाढविण्यासाठी ग्राहकांना तीन महिन्यांची मुदत द्यावी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa election 2027 AAP Congress
Goa First Alliance Formation
Goa First Alliance 2027
Mallikarjun Kharge Vehicle Attack
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com