Goa Tourism: फक्त 299 रुपये देऊन 2 तासांमध्ये फिराल संपूर्ण गोवा..

Goa Sightseeing Bus: गोव्यात डबल डेकर बस एक उत्तम सेवा देते, संपूर्ण प्रवासासाठी फक्त २९९ रुपये आकारले जातात
Goa Sightseeing Bus: गोव्यात डबल डेकर बस एक उत्तम सेवा देते, संपूर्ण प्रवासासाठी फक्त २९९ रुपये आकारले जातात
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism Travel Options

गोव्यात पर्यटनासाठी येण्याच्या विचारात असाल तर आता गोवा कसा फिरवा ही चिंता कायमची मिटली असं समजा. गोव्यात रेंटल बाईक किंवा गाड्यांची सोय उपलब्ध असली तरीही अनेकवेळा यामुळे बजेट हलण्याची शक्यता असते. इथे बऱ्यापैकी सरकारी आणि खासगी बसेस उपलब्ध असतात तरीही कोणत्यावेळी कोणती बस कुठे जाईल याचा ठाव लागत नाही.

अनोखळी जागेत मनसोक्त फिरायचं आणि हिंडायचं असेल तर गोव्यात डबल डेकर बस (Goa Sightseeing Bus) एक उत्तम सेवा देते महत्वाचं म्हणजे यामुळे कमीतकमी खर्चात तुमचा संपूर्ण गोवा फिरून होईल. कसं? चला पाहुयात....

या बससेवेच्या मदतीने केवळ दोन ते तीन तासांत अगदी सहज गोवा फिरून होतो. खर्चाचा अधिक विचार करावा लागत नाही कारण या संपूर्ण प्रवासासाठी फक्त २९९ रुपये आकारले जातात. या बसद्वारे दोन प्रकारच्या सेवा दिल्या जातात, एक निळ्या रंगाची बस असते तर दुसरी लाल. निळ्या बसच्या प्रवासात सर्व समुद्र किनारे पाहायला मिळतात तर लाल रंगाची बस सर्व प्रकारच्या ऐतिहासिक जागांची सफर करवते.

निळ्या बसच्या प्रवासात काय काय बघाल?

  • आग्वाद किल्ला

  • कांदोळी समुद्रकिनारा

  • कलंगुट समुद्रकिनारा

  • बाग समुद्रकिनारा (Baga Beach)

  • हणजूण समुद्रकिनारा

  • व्हागातोर समुद्रकिनारा

  • शापोरा किल्ला

लाला बसच्या प्रवासात काय काय बघाल?

  • दोना पावला

  • सायन्स सेंटर

  • मिरामर समुद्रकिनारा (Miramar Beach)

  • कला अकादमी

  • पणजी बाजार

  • पणजी जेट्टी

  • दीवजा सर्कल

  • ओल्ड गोवा चर्च

  • मंगेशाचे देऊळ

  • अटल सेतू

Goa Sightseeing Bus: गोव्यात डबल डेकर बस एक उत्तम सेवा देते, संपूर्ण प्रवासासाठी फक्त २९९ रुपये आकारले जातात
Goa Tourism: खुशखबर! गोव्यात 355 पैकी 351 शॅकना परवानगी; महिन्याभरात पर्यटकांच्या संख्येत वाढ

या बसची सेवा सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरु असते. त्यामुळे परिवारासह गोव्याला जायच्या तयारीत असाल तर प्रवासाची चिंता विसरून जा..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com