Goa Tourism: खुशखबर! गोव्यात 355 पैकी 351 शॅकना परवानगी; महिन्याभरात पर्यटकांच्या संख्येत वाढ

Goa Beach Shack: शॅक मालक असोसिएशनचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज यांनी सांगितले की, आम्हाला सरकारने पूर्ण सहकार्य केले आहे. केवळ ४ व्यावसायिकांना परवानगी देणे अजून बाकी आहे. परवानगी देण्याच्या प्रक्रियेत चार अर्ज आहेत.

Beach shackDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Tourism Department Approves 351 Shacks for Upcoming Season

पणजी: ऑक्टोबर महिन्यापासून राज्यात पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. या महिन्‍यात देशी विदेशी पर्यटकदेखील गोव्‍याला पसंती दर्शविली. शॅक व्यावसायिकांना यावर्षी पर्यटन खात्याने सहकार्य केल्याने ३५५ शॅकपैकी ३५१ शॅकना परवानगी मिळाली आहे.

शॅक मालक असोसिएशनचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज यांनी सांगितले की, आम्हाला सरकारने पूर्ण सहकार्य केले आहे. केवळ ४ व्यावसायिकांना परवानगी देणे अजून बाकी आहे. परवानगी देण्याच्या प्रक्रियेत चार अर्ज आहेत. काही कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने त्यांना उशीर झाला आहे. दरवर्षी होणारा त्रास यावर्षी होणार नाही असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले होते व त्‍यांनी आपला शब्‍द राखला.

पर्यटन हंगाम सुरु झाल्यापासून राज्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. सर्वच ठिकाणी शॅक व्यावसायिकांना फायदा झाला असे म्हणता येणार नाही, पण वाढत्या पर्यटक संख्येमुळे सर्वांचा व्यवसाय चांगला होईल, अशी खात्री क्रूझ कार्दोज यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Goa Beach Shack: शॅक मालक असोसिएशनचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज यांनी सांगितले की, आम्हाला सरकारने पूर्ण सहकार्य केले आहे. केवळ ४ व्यावसायिकांना परवानगी देणे अजून बाकी आहे. परवानगी देण्याच्या प्रक्रियेत चार अर्ज आहेत.
Goa Police: रात्री-अपरात्री पोलिस धडकणार घरी! 'गोव्या'त गुन्हेगारांवर करडी नजर; आठ दिवसांत १०५ जणांची चौकशी

महिन्यात पर्यटक वाढले

राज्यात पर्यटक हंगाम सुरु झाला आहे. पर्यटकांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्व हॉटेल व्यावसायिकांना फायदा होत आहे. एकंदरीत तुलनात्मक अभ्यास करायचा झाल्यास सुमारे १० टक्के पर्यटक संख्या वाढली असे म्हणण्यास हरकत नाही. पुढील महिन्‍यात देखील पर्यटक वाढणार अशी अपेक्षा टीटीएजी अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa beach shack law constitutional validity
Goa Shack Licenses Before October
Goa Beach Shack 20 Lakh Fine
Beach Shack Policy Extension
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com