गोमन्तक डिजिटल टीम
गोव्याची खाद्यसंस्कृती खास आहे. येथे माशांचे पदार्थ, नारळ आणि मसाल्यांचा जास्त वापर आढळतो.
गोवा म्हणजे सीफूड प्रेमींसाठी स्वर्गच! ताज्या आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या मासे, शिंपले, आणि कोळंबीचे खास पदार्थ येथील वैशिष्ट्ये आहेत.
गोव्यातील मसालेदार फिश करी आणि भात ही खासीयत आहे.
गोव्यातील खास मिठाई म्हणजे बेबिंका आणि दोदोल. पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही मिठाई खाद्यप्रेमींना नक्कीच आवडेल.
गोव्यातील ताजी फळे आणि नारळ पाणी हे आरोग्यप्रेमींना खूप आवडते.
गोव्यातील सण, उत्सव आणि फिस्तमध्ये अनेक पदार्थांची व्हरायटी मिळते, ज्यामुळे तुम्हाला पटते की गोवा म्हणजे फूड टुरिझम.