Goa Shipyard Vacancy: दीड ते दोन लाख रुपये महिना पगार; गोवा शिपयार्डमध्ये भरती, असा करा अर्ज

Goa Shipyard Job Opening: पात्र उमेदवारांना २८ फेब्रुवारी ते २७ मार्च २०२५ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
Goa Shipyard Job Opening
Goa Shipyard VacancyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Shipyard Direct Recruitment

मुरगाव: गोवा शिपयार्डने नोकर भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. दहा विविध पदांसाठी शिपयार्डमध्ये थेट भरतीची संधी पात्र उमेदवारांना मिळणार आहे. निवड झाल्यास उमेदवारला सातव्या वेतन आयोगानुसार दीड ते दोन लाख रुपये महिना पगार मिळेल. गोवा शिपायर्डच्या या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कोणत्या पदांसाठी आहे भरती? (Post Details)

१) मुख्य महाव्यवस्थापक (एचआर आणि ए) - एक जागा (अनारक्षित)

२) उपमहाव्यवस्थापक (संयोजन आणि विकास) - दिल्ली आणि मुंबई - ( ०२ जागा) (अनारक्षित)

३) उपमहाव्यवस्थापक (शिपलिफ्ट) - (०१ जागा) -

४) उपमहाव्यवस्थापक (अर्थ) - (०२ जागा) (इतर मागास वर्ग)

५) वरिष्ठ व्यवस्थापक (तांत्रिक) - (०१ जागा) (इतर मागासवर्ग)

६) वरिष्ठ व्यवस्थापक (शिपलिफ्ट) - (०१ जागा) (अनारक्षित)

७) सुरक्षा व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) - (०१ जागा) (अनुसूचित जाती)

८) व्यवस्थापक (अर्थ) - (०२ जागा) (अनारक्षित - ०१, इतर मागासवर्ग - ०१)

९) उपमहाव्यवस्थापक (अर्थ) - (०३ जागा) (अनारक्षित - ०२, एसटी - ०१)

१०) वरिष्ठ व्यवस्थापक (प्रशासन) - (०१ जागा) - अनारक्षित - ०१

Goa Shipyard Job Opening
Digital Arrest: अटकेचा धाक दाखवत गोव्यातील 68 वर्षांच्या महिलेला 1 कोटींचा गंडा, दोघांना अटक

पात्रता आणि ऑनलाईन अर्ज (Eligibility And Online Application)

यासाठी पात्र उमेदवारांना २८ फेब्रुवारी ते २७ मार्च २०२५ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पदासाठी आवश्यक पात्रता आणि इतर माहितीसाठी उमेदवारांना www.goashipyard.in या संकेतस्थळाला भेट देता येईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही अडचण/ समस्या येत असल्यास उमेदवारांना recruitment@goashipyard.com या ई-मेलवरुन संपर्क साधता येईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Goa Shipyard Job Opening
Margao: 'छत्रपती शिवाजी महाराजांऐवढेच भेंब्रे आमच्यासाठी वंदनीय'; उदय भेंब्रेंच्या समर्थनात साहित्यिक, राजकीय नेते मैदानात

पगार किती? (Salary Details)

गोवा शिपयार्ड या नोकर भरतीतील विविध पदांसाठी सतवा वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. विविध पदांसाठी ८० हजार, दीड लाख ते दोन लाख रुपयांपर्यंत पगार निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर भरती प्रक्रियेतील पुढील माहिती उमेदवारांना मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com