Digital Arrest: अटकेचा धाक दाखवत गोव्यातील 68 वर्षांच्या महिलेला 1 कोटींचा गंडा, दोघांना अटक

Digital Arrest Fraud Goa: फर्नांडिस नावाच्या महिलेने याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती.
Digital Arrest Fraud Goa
Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: 'दिल्ली क्राईम ब्रांचमधून बोलतोय', असे सांगून गोव्यातील ६८ वर्षीय महिलेला एक कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी मुंबईतून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी याच प्रकरणात पाच जणांना अटक केलीय. २६ फेब्रुवारी रोजी गोव्यातून मुंबईत गेलेल्या सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

राकेश पाटील आणि सचिन पाटील (रा. रायगड, महाराष्ट्र) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी राहुल मिश्रा (उत्तर प्रदेश), यरमळा वेंकटेशवारलू, रोशन शेख (दोघेही रा. आंध्रप्रदेश) आणि विसाख आर व मुहम्मदशहान (दोघेही केरळ) असे पाच जणांना अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी फर्नांडिस नावाच्या महिलेने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी आत्तापर्यंत सात जणांना अटक केली आहे.

Digital Arrest Fraud Goa
Margao: 'छत्रपती शिवाजी महाराजांऐवढेच भेंब्रे आमच्यासाठी वंदनीय'; उदय भेंब्रेंच्या समर्थनात साहित्यिक, राजकीय नेते मैदानात

दाखल तक्रारीनुसार, संशयितांनी फर्नांडिस या महिलेला व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून त्यांना दिल्ली क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच, त्यांना सर्वोच्च न्यायालयाची बनावट कागदपत्रे देखील पाठवली. दरम्यान, संशयितांनी महिलेला एक कोटी रुपये पाठविण्यास सांगितले. मिळालेल्या पैसे खात्यातून काढून संशयितांनी अनेक तात्पुरती बँक खाती देखील उघडली होती, असे तपासात उघड झाले आहे.

Digital Arrest Fraud Goa
FDA Raid: आरोग्यमंत्र्यांनी केली धडक कारवाईची घोषणा; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फार्मसी आणि रेस्टॉरंट्सना बंद करण्याचा इशारा

सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत तपासास सुरुवात केली असता आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत आठ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, दोन हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. पोलिसांना ४० लाख रुपये गोठवण्यात यश आले आहे. दरम्यान, नागरिकांनी पोलिस, न्यायाधीश किंवा ईडीचे अधिकारी बोलत असल्याचा दावा करणाऱ्या फोन कॉलपासून सावधान रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com