Goa Asmitai Dis
Goa Asmitai DisDainik Gomantak

Asmitai Dis: पणजीसह राज्यात आज 'अस्मिताय दीस', 'जीआय टॅग'प्राप्त अर्जदारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार

Goa Asmitai Dis: राजभाषा संचालनालयातर्फे राज्य पातळीवरील ‘अस्मिताय दीस’ (जनमत कौल) हा कार्यक्रम शुक्रवार, १६ रोजी सकाळी ९.३० वा. साजरा केला जाणार आहे.
Published on

पणजी: राजभाषा संचालनालयातर्फे राज्य पातळीवरील ‘अस्मिताय दीस’ (जनमत कौल) हा कार्यक्रम शुक्रवार, १६ रोजी सकाळी ९.३० वा. साजरा केला जाणार आहे.

हा कार्यक्रम गोवा राज्य जैवविविधता मंडळ साळगाव, गोवा राज्य विज्ञान व तंत्रज्ञान परिषद साळगाव व नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन संचालनालय पर्वरी यांच्या सहकार्याने आयोजिला आहे.

हा कार्यक्रम मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या मुख्य सभागृहात मुख्यमंत्री तथा राजभाषा मंत्री प्रमोद सावंत, विज्ञान, तंत्रज्ञान मंत्री बाबूश मोन्सेरात तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. ‘जीआय टॅग’ प्राप्त अर्जदारांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल.

तसेच, फुलवाले, भाजीवाले, पाडेली/रेंदेर, मिठागर, कामगार, मच्छीमार, ग्रामीण वैद्य, पोदेर, गूळ तयार करणारे, मल्ले विणणारे, करवंटी, काथ्या यांपासून वस्तू तयार करणारे कारागीर, विशेष व्यवसाय - बांबू कामगार खाजेकार, शेवकार, फोवकार, चणेकार, विणकार (बनकर) अशा पारंपरिक व्यावसायिकांना ‘कौशल्य मित्र कार्ड’ देण्यात येईल.

Goa Asmitai Dis
Goa Restaurants Sealed: चार विनापरवाना रेस्टॉरंटना टाळे, जिल्हा प्रशासनाची कारवाई; हरमलात एका आस्थापनावर बडगा

राज्यभरात होणारे कार्यक्रम

गोवा कोकणी अकादमीतर्फे दिव्यांग मुलांसाठी चेतना एज्युकेशन सोसायटी स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन, कुडचडे येथे स. १० वा. ‘अस्मितेचो भेसरंग’.

सत्तरी येथे साहित्य मंथन - सत्तरी आणि पीएम श्री सरकारी हायस्कूल, ठाणे सत्तरी यांच्या सहकार्याने स. १० वा. ‘अस्मिताय आनी तरणाटे’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा.

दाल्गाद कोकणी अकादमीतर्फे सेंट थॉमस चर्च हॉल, कासावली येथे स. ९.३० वा. कोकणी गीत संगीत कार्यक्रम. दु. ३.३० वा. पणजी येथे कविता सांज.

कोकणी भाषा मंडळातर्फे कोकणी भवन, मडगाव येथे स. ८ ते दुपारी १२ वा. प्रश्नमंजूषा स्पर्धा, दु. १२ ते १ पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम. सायं. ४ ते ६ पर्यंत गोमन्त विद्या निकेतन, मडगाव येथील सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम.

केपे तालुक्यातील शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये विविध स्पर्धा.

Goa Asmitai Dis
Goa PSI Recruitment: पोलीस भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात! 800 मीटर धावण्याच्या चाचणीवर आक्षेप, न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस

‘जीआय टॅग’ प्राप्त उत्पादनांचे प्रदर्शन

यावेळी ‘जीआय टॅग’ प्राप्त झालेल्या गोमंतकीय उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या ‘गो वन’ उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीही या कार्यक्रमात होईल. यावेळी पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. उदघाटन सोहळ्यानंतर ‘अस्मितेचीं गितां’ हा कार्यक्रम होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com