Electric Bus : नववर्षात पणजीतील रस्त्यांवर आता धावणार रंगीबेरंगी बसगाड्या; 19 जानेवारीपासून सेवेला प्रारंभ

Electric Bus : ४४ बसगाड्यांच्या दिवसभरात ५०० वर फेऱ्या : १९ जानेवारीपासून सेवेला प्रारंभ; ३० दिवसांत आक्षेप नोंदवावेत
smart city electric bus
smart city electric busDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Electric Bus : पणजीत पुढील वर्षी वाहतूक खात्याच्यावतीने शहरभर बससेवा मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कदंब परिवहन महामंडळाच्यावतीने ही सेवा अमलात येणार आहे.

या सेवेसाठी खास रंगीबेरंगी बसेसचा वापर केला जाणार आहे. १९ जानेवारी २०२४ पासून ही सेवा सुरू होणार असल्याचे वाहतूक खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.

पणजी बसस्थानकावरून मिरामार, दोनापावला, करंझाळे, बांबोळी, गोवा विद्यापीठ, कुजिरा, ताळगाव, सांतिनेज, सांताक्रुझ आणि आल्तिनो या परिसरात या बसेस फिरणार आहेत. या सेवेविषयी कोणास आक्षेप असतील, तर त्यांनी अधिसूचना जारी झाल्यापासून ३० दिवसांत आक्षेप पर्वरी येथील वाहतूक खात्याच्या सचिवाकडे नोंदवावेत, असेही कळविण्यात आले आहे.

या सेवेमध्ये मिनी बसेस (डिझेलवर चालणाऱ्या) ३० सीटर, मोठ्या बसेस (इलेक्ट्रिकल) ४९ सीटर, मिनी बसेस (इलेक्ट्रिकल) २६ सीटर, मायक्रो बस (इलेक्ट्रिकल) १४ सीटर आणि बग्गीज (इलेक्ट्रिकल) ११ सीटर. या सेवेसाठी एकूण किमान ४४ बसेसचा समावेश असेल आणि दिवसाला किमान ५०० फेऱ्या होतील.

smart city electric bus
Goa PWD: सावधान! आता 2 महिने पाणी बिल न भरल्यास होणार 'ही' कारवाई

मार्ग कलर कोड एकूण फेऱ्या (प्रति दिन)

पणजी बसस्थानक-कला अकादमी-काकुलो मॉल-सांतिनेज निळा ५७

पणजी बसस्थानक-दिवजा सर्कल-पणजी बसस्थानक पिवळा १०८

पणजी मार्केट-मिरामार--कवायत मैदान लाल ७८

पणजी बसस्थानक-पणजी बसस्थानक हिरवा १०८

पणजी मार्केट-काकुलो-गोमेकॉ-कुजिरा इंडिग १०२

पणजी बसस्थानक-दिवजा सर्कल-पणजी बसस्थानक जांभळा ७९

पणजी बसस्थानक-सांताक्रुझ -पणजी बसस्थानक नारंगी ४१

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Electric Bus Proposal Cancelled
Goa Rakshan Yatra
Taxi Driver Attack Goa
Kadamba Bus Drivers Recruitment
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com