Kadamba Electric Bus : इलेक्ट्रिक बससेवेची फेब्रुवारीत चाचणी; ‘कदंब’चा उपक्रम

Kadamba Electric Bus : पणजीत दहा स्मार्ट बसस्थानके उभारणार
Kadamba Electric Bus
Kadamba Electric Bus Dainik Gomantak
Published on
Updated on

Kadamba Electric Bus : पणजी राजधानीत लवकरच कदंब परिवहन महामंडळातर्फे इलेक्ट्रिक बससेवा सुरू होणार आहे. या सेवेची फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात चाचणी होणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीत स्मार्ट बसस्थानकांचीही निर्मिती करण्यात येत असून, दहा ठिकाणी असे बसस्थानक नजरेस पडतील.

सध्या नव्या स्मार्ट बसस्थानकाची निर्मिती कशी असेल याचे मॉडेल कला अकादमीच्या समोर उभारले आहे. त्याच धर्तीवर सर्वत्र अशी बसस्थानके उभारली जात आहेत.

सध्या आल्तिनो येथील जॉगर्स पार्क येथे अशा बसस्थानकाची निर्मिती सुरू आहे. पणजी शहरात सात मार्गांवर इलेक्ट्रिक बसगाड्या सुरू करण्यात येणार आहेत.

त्यासाठी ४८ इलेक्ट्रिक बसगाड्यांचा वापर होणार आहे. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत फेब्रुवारीपर्यंत अनेक कामे मार्गी लागतील, तर नव्याने काही कामे सुरू होतील.

Kadamba Electric Bus
Goa Crime Case: पहाटे 2 ते 4 ची वेळ साधली, वाड्यावरची सहा घरे फोडली; दाबोळीतील घटनेने खळबळ

परंतु शहरात इलेक्ट्रिक बससेवा ही स्मार्ट सिटीचा एक भाग आहे. या सेवेत प्रवाशांना बसस्थानकावर तिकीट मिळेल. त्याशिवाय या सेवेचे मार्ग दाखविणारा नकाशा बसस्थानकात पाहायला मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com