दाबोळी: समुद्र पर्यटनाच्या (sea tourism) मोसमाला (Season) आरंभ झाला असून रविवारी कोर्डेलिया हे प्रवाशी (Passenger) जहाज 1500 प्रवासी व 600 क्रुझसह मुरगाव बंदरात आले.1 ऑक्टोबर 2021 ते 7 एप्रिल 2023 या हंगामामध्ये सदर जहाज एकूण 58 फेऱ्या गोव्यात मारणार आहेत.यातून जवळपास लाखभर पर्यटक गोव्यात (Goa) येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याकाळात एकूण येत्या 1 ऑक्टोबरपासून समुद्र पर्यटन मोसम वेग पकडण्याची शक्यता आहे. समुद्र पर्यटनाला आरंभ झाल्याने पर्यटन व्यवसायाला उभारी येण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. कोर्डेलिया या प्रवासी जहाजाने यापूर्वी कोचिन, लक्षद्वीप येथे समुद्र पर्यटनसाठी फेऱ्या मारल्या आहेत.त्यानंतर ते गोव्यात आले. या जहाजातून दीड हजार प्रवासी आल्याने संबंधित यंत्रणांनी आनंद व्यक्त केला आहे.
महामारीमुळे 2020 पासून समुद्र पर्यटन बंद झाल्याने टॅक्सी, बस, रेस्टारंट व इतर संबंधित व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे देशी जहाजांबरोबर विदेशी जहाजांची रेलचेल पुर्णपणे ठप्प झाली होती. आता हंगाम सुरू झाल्याने व पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने देशांतर्गत समुद्र पर्यटन सुरू करुन केंद्र सरकारने एकप्रकारे पर्यटन हंगामाला चालना देऊन नांदी सुरू केली आहे.यातून विदेशी पर्यटक जहाजांना चालना देण्यासाठी ही एकप्रकारे रीअलसलच आहे.सद्या विदेशी जहाजांची कॅरेबियन देशात रेलचेल सुरु आहे.त्याठीकाणी कोरोनाचा फैलाव नसल्याने सागरी पर्यटन हंगामाला जोमाने सुरू आहे.
दरम्यान मुरगाव बंदरात पर्यटक जहाज दाखल झाल्याने व्यावसायिक सुखावले आहेत. गोव्यात आलेल्या प्रवाशांच्या बाबतीत कोविडसंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येत आहे. मागील वर्षी करोनामुळे पर्यटनाला फटका बसला.
राज्यात दरवर्षी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढती राहिली आहे. याला अपवाद केवळ २०२० वर्षाचा आहे. गेल्या वर्षी मार्चपासून करोनामुळे लॉकडाऊन आणि विविध व्यवसायांवर बंधने होती. त्याचा सर्वच व्यवसायांना फटका बसला आणि अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम दिसून आला. यातून पर्यटन व्यवसाय सुटला नाही. 2019 साली देशी आणि विदेशी मिळून 80 लाख 64 हजार 400 पर्यटकांनी राज्याला भेट दिली होती. त्या तुलनेत 2020 साली नोव्हेंबरपर्यंत केवळ 25 लाख 82 हजार 52 पर्यटकच राज्यात येऊ शकले.
जगभरात 27 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून जाहीर झाला आहे. यानिमित्त राज्यात आणि देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कॅसिनोमुळे लागू असलेला कर्फ्यू नुकताच हटवण्यात आला आहे. कॅसिनो, मसाज पार्लर यांसह विविध व्यवसाय काही बंधने ठेवून सुरू करण्यात आली आहेत. आता राज्यात पुन्हा हळूहळू पर्यटन बहरेल, अशी आशा निर्माण झाली आहे. पाऊस संपल्यानंतर राज्यात पर्यटकांची संख्या वाढण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. चार्टर विमानांना अद्याप परवानगी नसल्याने सध्या देशी पर्यटक मोठ्या संख्येने राज्यात दाखल झाल्याचे पाहण्यात आले आहे.
दरम्यान समुद्र पर्यटनाच्या मोसमाला आरंभ झाला असून रविवारी कोर्डेलिया हे प्रवाशी जहाज 1500 प्रवासी व 600 क्रुझसह मुरगाव बंदरात दाखल झाले.1ऑक्टोबर 2021 ते 7 एप्रिल 2023 या हंगामामध्ये सदर जहाज एकूण 58 फेऱ्या गोव्यात मारणार आहेत.यात ऑक्टोबर महिन्यात 5 फेऱ्या, नोव्हेंबर महिन्यात 3,डीसेंबर 2021 मध्ये २फेऱ्या मिळून एकूण 10 वेळा सदर जहाज डीसेंबर पर्यंत मुरगाव बंदरात दाखल होणार आहे.नंतर वर्ष 2022 च्या सूरुवातीला 2 जानेवारी रोजी सदर जहाज मुरगाव बंदरात दाखल होणार आहे.या महिन्यात एकूण सदर जहाजाच्या 5 फेऱ्या होणार आहे.तदनंतर फेब्रुवारी महिन्यात 3 फेऱ्या, मार्चमध्ये 4 फेऱ्या, एप्रिल महिन्यात 5 फेऱ्या,में महिन्यात 5 फेऱ्या,नंतर जुन, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मान्सून काळात ब्रेक असणार आहे.
नंतर ऑक्टोबर महिन्यात सागरी पर्यटन हंगामाला पुन्हा एकदा सुरू होईल.या महिन्यात सदर जहाजाच्या एकूण 3 फेऱ्या होणार आहेत.नोव्हेंबर महिन्यात एकूण 4 फेऱ्या,तर डीसेंबर महिन्यात एकूण 5 फेऱ्या होणार असून 2022 मध्ये सदर जहाजाच्या मुरगाव बंदरात एकूण 34 फेऱ्या अपेक्षित आहेत.नंतर 2023 मध्ये जानेवारी महिन्यात एकूण 4 फेऱ्या, फेब्रुवारी महिन्यात एकूण 4 फेऱ्या, मार्चमध्ये 4 फेऱ्या,तर एप्रिल महिन्यात शेवटच्या 2 फेऱ्या मारुन सदर जहाज आपल्या सागरी पर्यटन हंगामाची सांगता करणार आहे.2023 मध्ये सदर जहाजाच्या मुरगाव बंदरात एकूण 14 फेऱ्या अपेक्षित आहे.सदर जहाज मुंबई-गोवा-लक्षद्वीप व परत असा पर्यटन प्रवास असेल.मुरगाव बंदरात शुक्रवारी व रविवारी अशा फेऱ्या सदर जहाजाच्या असणार आहे.सदर जहाजाची प्रवासी मर्यादा 2550 एवढी असून, प्रत्येक फेरीत किमान 1500 पर्यटक गोव्यात दाखल होणार असल्याची अपेक्षा आहे.तेव्हाच काय तो गोव्याच्या पर्यटन हंगामाला बहर येईल.याच आशेवर पर्यटन खात्याबरोबर संबंधित यंत्रणां आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.