पालिका मंडळाने जागृत होवून विकास करावा ; उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

पालिकेच्या निधीतून विकास कामांचा शुभारंभ करताना मात्र पेडणे पालिकेचा एकही अभियंता उपस्थित नव्हता
विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर
विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पेडणे (Pernem) पालिका क्षेत्राचा कोणत्या प्रकारचा विकास करायचा असेल यांचे पालिका मंडळाने जागृत राहून नियोजनबद्ध विकास करावा, पालिका क्षेत्राच्या (Municipal Corporation) विकासाला निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांनी सावळवाडा पेडणे येथील सरिता आमोणकर निवास्थान जवळील संरक्षण भिंतीचे पालिकेच्या निधीतून ९ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे. त्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर
विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरDainik Gomantak
विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर
Goa Police Recruitment 2021: 12वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

यावेळी नगराध्यक्ष उषा नागवेकर, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका राखी कशालकर, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, माजी उपनगराध्यक्ष रामा सावळ देसाई, गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक विश्वनाथ तिरोडकर, नगरसेविका विशाखा गडेकर, माजी नगरसेवक विश्राम गडेकर, आदी नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना पालिकेने एकूण दहाही प्रभागात नागर्सेवाकांना विश्वासात घेवून विकास करावा, विकास करत असताना जमीन मालकांच्या अडचणी येत असतील तर त्यांच्याकडे बोलून जागेचे ना हरकत दाखले घेवून विकासाला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले.

विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर
तुये हॉस्पिटलचे की इमारतीचे उद्घाटन ; माजी सरपंचाचा सरकारला खोचक सवाल

नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी बोलताना सरकारच्या माध्यमातून आणि पालिका मंडळाच्या सहकार्यातून पालिका क्षेत्राचा समान विकास करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत विकासाला सर्व पालिका मंडळाने नागरिकांनी सहकार्य केल्यास विकासाला अडचणी येणार नाही. सध्या उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी विकास कामांचा झपाटा लावलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परत एकदा त्यानाच लोकप्रतीनिधीत्व बहाल करतील असा विश्वास व्यक्त केला.

पालिकेच्या निधीतून विकास कामांचा शुभारंभ करताना मात्र पेडणे पालिकेचा एकही अभियंता उपस्थित नव्हता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com