

पणजी: सहा वर्षांत राज्यातील ४९ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या. परंतु, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या संख्येत वाढ झाली. तर, दुसरीकडे या २०२०–२१ च्या तुलनेत २०२५–२६ मध्ये सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे सरकारने जारी केलेल्या एका अहवालातून समोर आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांची अवस्था बिकट होत चाललेली आहे. त्यातून सहा वर्षांच्या काळात तब्बल ४९ शाळा बंद पडल्या.
पण, याच काळात २०२०–२१ च्या तुलनेत २०२५–२६ मध्ये अनुदानित शाळांची संख्या ५, तर विनाअनुदानित शाळांच्या संख्येत ८ ने वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. २०२०–२१ ते २०२५–२६ या काळात अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या केवळ २०२२–२३ मध्येच वाढली.
परंतु, त्यानंतरच्या काळात अनुदानितसह सरकारी आणि विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची संख्याही सातत्याने कमी होत गेल्याचेही अहवालातून स्पष्टपणे दिसून येते.
वर्ष सरकारी अनुदानित विनाअनुदानित
२०२०–२१ १९,६०४ ५२,१८३ २३,९७५
२०२१–२२ १९,४४४ ५२,१२० २२,०४७
२०२२–२३ १९,६३८ ५२,५२८ २१,५६८
२०२३–२४ १९,२९० ५२,१९१ २१,१०३
२०२४–२५ १८,४६५ ५१,८९४ २१,०५६
२०२५–२६ १७,६८४ ५०,१४३ २०,९७३
सरकारी प्राथमिक शाळा
वर्ष सरकारी अनुदानित विनाअनुदानित
२०२०–२१ ७२८ २८४ १२७
२०२१–२२ ७१८ २८६ १२९
२०२२–२३ ७१२ २८७ १२९
२०२३–२४ ६९६ २८७ १३०
२०२४–२५ ६८७ २८९ १३२
२०२५–२६ ६७९ २८९ १३५
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.