Goa School Vacation Dates: गोव्यातील विद्यार्थ्यांना कधी मिळणार सुट्टया? आगामी शालेय वर्षासाठी वेळापत्रक जारी

Goa school timetable: आदेशानुसार, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी संपूर्ण शैक्षणिक वर्षात एकूण कामकाजाचे दिवस २२० पेक्षा कमी नसावेत.
Goa school timetable, Goa school vacation dates
Goa school timetable, Goa school vacation datesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : आगामी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते पाचवी आणि अकरावीचे वर्ग ६ जून २०२६ पासून सुरू होतील. तर, सहावी ते दहावी आणि बारावीसाठी पहिली टर्म १ एप्रिल ते १० ऑक्‍टोबर आणि दुसरी टर्म १२ ऑक्‍टोबर ते २४ मार्च अशी असेल. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी आगामी वर्षातील वेळापत्रक आणि सुट्ट्या जाहीर करत, त्‍यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

आदेशानुसार, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी संपूर्ण शैक्षणिक वर्षात एकूण कामकाजाचे दिवस २२० पेक्षा कमी नसावेत, तर प्रत्यक्ष अध्यापनाचे दिवस किमान २०० असणे अनिवार्य असतील.

दररोज किमान साडेपाच तास अध्‍यापन

दररोज किमान साडेपाच तास अध्‍यापन असावे, पहिली सत्र परीक्षा १० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी तर दुसरी सत्र परीक्षा १३ मार्च २०२७ पर्यंत घेऊन अंतिम परीक्षेचा निकाल ३१ मार्च २०२७ नंतर जाहीर करावा, असेही आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.

Goa school timetable, Goa school vacation dates
Goa Politics: खरी कुजबुज; ...तर विद्यार्थी नापास होतील की शिक्षण खाते?

अशा असतील सुट्ट्या

गणेश चतुर्थी :

१४ ते १९ सप्टेंबर

दिवाळी : २ ते २१ नोव्हेंबर

नाताळ : २४ डिसेंबर ते २ जानेवारी २०२७

उन्हाळी सुट्टी :

१ मे ते ५ जून २०२७.

शिवाय १० स्वेच्छा सुट्ट्या देण्याची मुभा.

पैकी ४ सुट्ट्या चतुर्थीसाठी, उर्वरित ६ चर्चा करून ठरवणार

Goa school timetable, Goa school vacation dates
Goa Education: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहा टक्‍के गुण मिळवणारेही होणार उत्तीर्ण; वाचा संपूर्ण माहिती..

शिक्षक, विद्यार्थ्यांना नियोजनाचे आवाहन

शिक्षण संचालनालयाने स्‍पष्‍ट केले आहे की, हे वेळापत्रक गोव्‍यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांसाठी लागू राहणार आहे. शाळा व्‍यवस्‍थापन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी या वेळापत्रकाची नोंद घेऊन आपापले नियोजन करावे. त्‍यामुळे त्‍यांना पुढील दिशा ठरविणे सुलभ होईल. साहजिकच त्‍यांचा वेळ वाचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com