Goa School Girl Molestation: ‘त्‍या’ पीई शिक्षकाकडून यापूर्वीही दोन ठिकाणी विनयभंगाचे प्रयत्न

फातर्पातील पालक खवळले; सेवेतून बडतर्फ करण्‍याची मागणी
Goa School Girl Molestation
Goa School Girl MolestationDainik Gomantak
Published on
Updated on

Goa School Girl Molestation Case: फातर्पा येथील एका शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्‍याच्‍या आरोपाखाली कुंकळ्‍ळी पोलिसांनी अटक केलेल्‍या रमेश गावकर याने यापूर्वी मळकर्णे आणि आंबावली या दोन ठिकाणी शिकविताना विद्यार्थिनी आणि महिला शिक्षिकेचा विनयभंग करण्‍याचा प्रयत्‍न केला होता, असे पोलिस तपासात पुढे आले आहे.

ही माहिती उघडकीस आल्‍यानंतर खवळलेल्‍या फातर्पा शाळेतील विद्यार्थ्यांच्‍या पालकांनी अशा शिक्षकाला शिक्षण खात्‍याने सेवेत न ठेवता त्‍याला त्‍वरित बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे.

Goa School Girl Molestation
गुड न्यूज! गोव्यात भाजीपाला उत्पादन प्रतीहेक्टरी 11,681 किलोवर, तर फलोत्पादन 9,854 किलोवर; भात उत्पादनात मात्र घट

काल एका विद्यार्थिनीच्‍या पालकाने विनयभंगाची तक्रार नोंदविल्‍यानंतर कुंकळ्‍ळी पोलिसांनी गावकर याला अटक केली होती. मात्र, त्‍याला सोडण्‍यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव आणला जात आहे अशी चर्चा सुरू झाल्‍यानंतर पालकांनी आज शाळेच्‍या आवारात गर्दी करून अटक केलेल्‍या शिक्षकाला बडतर्फ करण्‍यात यावे, ही मागणी लावून धरली.

शाळेच्‍या आवारात मोठ्या प्रमाणावर पालक जमा झाल्‍याने पोलिसांना पाचारण करण्‍यात आले. स्‍थानिक आमदार एल्‍टन डिकॉस्‍ता हेही तेथे धावून आले. यावेळी दक्षिण गोव्‍याच्‍या वन स्‍टॉप केंद्राच्‍या संचालिका आवदा व्‍हिएगस यांनाही पोलिसांनी बोलावून घेतले. त्‍यांनी चौकशी सुरू केली आहे.

Goa School Girl Molestation
Amit Palekar Arrested: बाणस्तारी मर्सडीज अपघात प्रकरणी 'आप'चे नेते अमित पालेकर यांना अटक; पालेकर म्हणतात, हे भाजपचे डर्टी पॉलिटिक्स...

पोलिस तपासात काय आढळले?
1. शिक्षक गावकर मळकर्णे येथील शाळेत शिकवित असताना त्‍याच्‍या एका सहकारी शिक्षिकेने त्‍याच्‍या विरोधात लैंगिक अत्‍याचाराची तक्रार दाखल केली होती आणि त्‍याहीपूर्वी आंबावली येथील शाळेत शिकवित असताना एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्‍याचा प्रयत्‍न केला होता.
2. मात्र काही राजकारणी त्‍याच्‍या मदतीला धावून आल्‍याने कुठलीही पोलीस तक्रार न होता तो सुटला होता. मात्र, नंतर त्‍याची त्‍या शाळेतून मळकर्णेला बदली करण्‍यात आली होती.


संबंधित शिक्षकाला पॉक्‍सो कायद्याखाली आणि गोवा बाल (संरक्षण) कायद्याखाली अटक केली आहे. या शिक्षकावर खात्‍याअंतर्गत कारवाई करण्‍यात यावी यासाठी आम्‍ही शिक्षण खात्‍यालाही कळविले आहे.
- अभिषेक धनिया, दक्षिण गोव्‍याचे पोलीस अधीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com