Amit Palekar Arrested: बाणस्तारी मर्सडीज अपघात प्रकरणी 'आप'चे नेते अमित पालेकर यांना अटक; पालेकर म्हणतात, हे भाजपचे डर्टी पॉलिटिक्स...

भाजपमध्ये येण्याची ऑफर नाकारल्यानेच कारवाई केल्याचा पालेकर यांचा आरोप
Banastarim Bridge Accident: Amit Palekar Arrested
Banastarim Bridge Accident: Amit Palekar ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी येथे झालेल्या मर्सडीज अपघात प्रकरणात क्राईम ब्रँचने गुरूवारी आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांना अटक केली.

या अपघातातील मर्सडीज परेश सावर्डेकर चालवत होता. त्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत तिघांचा बळी घेतला होता. तथापि, त्याचा बचाव करण्यासाठी अमित पालेकर यांनी एका बनावट चालकाला तयार केले आणि त्याला म्हार्दोळ पोलिस स्थानकात नेले होते, असे तपासात आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

(AAP leader Amit Palekar Areested)

Banastarim Bridge Accident: Amit Palekar Arrested
Goa Red Light Area: गोव्यात रेड लाईट एरियाची गरज; तारा केरकर यांची मागणी

काय म्हणाले अमित पालेकर?

दोन ते तीन दिवसांपुर्वी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपमध्ये नाही आलो तर मला अटक करण्याची धमकी देण्यात आली होती. आणि आज मला अटक करण्यात आली आहे. हे निव्वळ डर्टी पॉलिटिक्स आहे.

या गुन्ह्याशी माझा काहीही संबंध नाही. माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. अत्यंत गलिच्छ राजकारणाचा हा प्रकार आहे.

Banastarim Bridge Accident: Amit Palekar Arrested
Porvorim Police News: 18 लाख रूपयांची घेतली लाच; साल्वाडोर दा मुंडचे पंच सदस्य कृष्णकांत चोडणकर विरोधात गुन्हा

या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता तर तिघे जण जखमी झाले होते. एका पार्टीतून बाहेर पडल्यानंतर सावर्डेकर कुटूंबीय मर्सडीजमधून जात असताना हा अपघात झाला होता. त्या पार्टीचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यात अमित पालेकर देखील दिसून येत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com