Goa Saras 2023 : मडगावात उद्यापासून ‘गोवा सरस’

मंत्री गोविंद गावडेंनी दिली पत्रकार परिषदेत माहिती
Goa Saras 2023
Goa Saras 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

ग्रामीण विकास प्राधिकरणाच्या वतीने कलाकार, स्वयंसाह्य गटांना व्यासपीठ मिळावे यासाठी मडगाव येथील एसजीपीडीए मैदानावर 23 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत गोवा सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. ते संस्कृती भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते. यावेळी अधिकारी प्रविण बरडे उपस्थित होते.

Goa Saras 2023
KKR च्या स्टार फलंदाजाला गोव्यात घ्यायचा होता 'हा' अनुभव, पत्नीला खोटं बोलून रात्री पडला बाहेर...

गावडे म्हणाले, गोवा सरसच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार फ्रान्सीस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर उपस्थित राहणार आहेत.

दीड महिन्यापूर्वी उत्तर गोव्यात पणजी येथे गोवा सरस प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देशातील विविध राज्यातील कलाकार, कारागीर, यात सहभागी होणार असून सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होतील

Goa Saras 2023
जुने ते शहर दे माझे...

या कार्यक्रमादरम्यान विविध कलांचे प्रशिक्षण वर्ग तसेच महिलांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांची यशोगाथा तसेच अनुभवकथन करतील. त्यामुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल. या प्रदर्शनात एकूण 220 स्टॉल्स असतील. पणजी येथे झालेल्या गोवा सरस मध्ये सुमारे 6 कोटींची उलाढाल झाल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa politics Marathi language issue
Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
Goa Dinesh Gawade Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com