सरकारी आणि खासगी क्षेत्रात नोकरीची मोठी संधी! फोंड्यात सॅनिटरी निरीक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; ४० जागा उपलब्ध!

Goa Sanitary Inspector Course: बारावी उत्तीर्ण तसेच दहावीनंतर दोन वर्षांचा डिप्लोमा केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत.
Goa Sanitary Inspector Course
Goa Sanitary Inspector CourseDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या गोवा केंद्रामार्फत नागेशी-बांदोडा येथील संजीवन संस्थेत सॅनिटरी निरीक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या या पंधराव्या तुकडीत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ४० उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.

बारावी उत्तीर्ण तसेच दहावीनंतर दोन वर्षांचा डिप्लोमा केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत. एक वर्ष कालावधीच्या या कोर्सचे वर्ग शनिवार व रविवार असे आठवड्यातून दोन दिवस घेतले जातील.

Goa Sanitary Inspector Course
Goa Mega Job Fair 2026: राज्यात 3,500 नोकऱ्यांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नगरपालिका, इस्पितळे, केंद्र व राज्य सरकारी आस्थापना तसेच खासगी क्षेत्रात सॅनिटरी निरीक्षक म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती गोवा प्रदेश संचालक डॉ. विश्वनाथ सावंत तळावलीकर यांनी दिली. इच्छुकांनी नागेशी-बांदोडा येथील केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com