Goa Online Taxi Service : दाबोळीत 15 ऑक्टोबरपासून टॅक्सी ॲप सेवा सुरू

‘मल्टीमॉडेल वाहतूक ॲप’मध्ये बस, टॅक्सी, रिक्षा, दुचाकी पायलट यांचा सहभाग असेल.
Goa Airport | Dabolim
Goa Airport | DabolimDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Online Taxi Service : पर्यटकांना सेवा सुरळीत व सुलभ होण्यासाठी ‘मल्टीमॉडेल ट्रान्स्पोर्ट ॲप’ आणले जाणार आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत दाबोळी विमानतळावर हे टॅक्सी ॲप सेवा सुरू होईल, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आज दिली. ते म्हणाले, ‘मल्टीमॉडेल वाहतूक ॲप’मध्ये बस, टॅक्सी, रिक्षा, दुचाकी पायलट यांचा सहभाग असेल.

विमानतळावर कदंबची बससेवाही सुरू करण्यात येणार आहे. ज्या भागात या बसेस जात नाहीत, तेथे पर्यटकांना त्यांच्या पसंतीनुसार सेवा उपलब्ध असेल. मोपा विमानतळ खासगी सहभागातून उभारण्यात आल्याने तेथे ओला, उबर हे येणारच याचा पुनरुच्चार गुदिन्हो यांनी केला.

दाबोळी विमानतळावर यापूर्वी ‘गोवा माईल्स’ ॲप काऊंटर होते. मात्र, टॅक्सी चालकांचा विरोध व प्रक्रिया नियमानुसार नसल्याने ते बंद झाले. काऊंटर बंद करूनही अजूनही ॲप व्यवसाय सुरळीत आहे. पर्यटकांना टॅक्सी ॲप हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते. तसेच दाबोळी येथे सुरू होणाऱ्या टॅक्सी ॲप सेवेसाठी गोवा माईल्सचाही पुन्हा विचार होऊ शकतो. स्थानिक टॅक्सी व पर्यटकांच्या हितार्थ राज्यात ‘मल्टीमॉडेल ट्रान्स्पोर्ट ॲप’ आवश्‍यक आहे, अशी भूमिका मंत्री माविन यांनी घेतली.

Goa Airport | Dabolim
CM Pramod Sawant : सांगेतील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाची पायाभरणी 6 महिन्यात

टॅक्सी ॲप सेवा हाच पर्याय

दाबोळी विमानतळावरील टॅक्सीचालक भरमसाट भाडे आकारत असल्याने पर्यटक मोपा विमानतळाचा वापर करतील. पर्यटकांची संख्या कमी झाल्यास त्याचा फटका या दाबोळीवरील टॅक्सी चालकांना बसेल. पर्यटक स्वस्त व सुलभ सेवा डिजिटलाईज्डच्या माध्यमातून शोधतात. हे टॅक्सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरील चर्चेवेळी निदर्शनास आणून दिले आहे. ही स्थिती उद्‍भवू नये, यासाठी टॅक्सी ॲप सेवा हाच पर्याय असल्याचे माविन गुदिन्हो सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com