Goa News: ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ला तीव्र विरोध

Goa News: वाडे-कुर्डी ग्रामसभा : निर्णय बदलण्यासाठी दीड महिन्याची मुदत
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: वाडे, कुर्डी ग्रामस्थेत ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ला दोन्ही हात वर करून शेकडो ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून जोपर्यंत अधिसूचना मागे घेत नाही, तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.

सामान्य जनतेला न्याय द्यायचा असल्यास सरकारला अजून दिड महिना मुदत देण्यात येत असून डिसेंबरअखेर परत एकदा मोठ्या प्रमाणात जनजागृती करून पुढील रणनीती नक्की करण्याचा निर्धार सभेत व्यक्त करण्यात आला.

व्यासपीठावर सभेचे अध्यक्ष ॲड. आनंद गावकर, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, गोमंतक गौड मराठा समाजाचे अध्यक्ष विश्वास गावडे, नेत्रावळीचे सरपंच बुंदा वरक, अनिल काकोडकर उपस्थित होते.

आनंद गावकर म्हणाले, गुजरात, कर्नाटक राज्यात भाजपा सरकार असून सुद्धा त्या राज्यात इको सेन्सेटिव्ह झोनला विरोध करण्यात येत असताना भाजपा राज्यातील पर्यावरणमंत्री गोव्यातील 59 गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी ‘ना हरकत’ प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवत आहे, याचा अर्थ सामान्य जनतेच्या प्रश्नाशी गोवा सरकारला काहीच देणे-घेणे नसल्याचे सिद्ध होत आहे.

यापूर्वी या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा झाल्यानंतर आपण तोडगा काढू असा शब्द दिला होता, परंतु हा प्रश्‍न जैसे थे आहे, आनंद गावकर यांनी सांगितले.

1999 साली जेव्हा अभयारण्याचा विषय आला होता, तेव्हा काही होणार नाही, सर्व काही जनतेला हवे तसे होणार असल्याचे सांगितले जात असताना आज तुडव, वेर्ले येथील जमिनीचा वाद न्यायालयात तिंबलो विरुद्ध तुडव वेर्लेवासिय असा चालला असताना दोन न्यायालयात तिंबलो खटला हरले.

गावकरी जिंकले असताना आता नेत्रावळी अभयारण्य तुडव वेर्लेतील जमीन आपली असल्याचा दावा पेश करतात, याचा अर्थ काय होतो. आता हा इको सेन्सेटिव्ह झोन मंजूर झाल्यास भविष्यात लोकांना आपला हक्क, संस्कृती, परंपरेवर गदा आणली जाणार आहे.

Goa News
स्टेज चारचा कॅन्सर, धड चालताही येत नव्हते; गोव्याच्या IPS अधिकाऱ्याने पूर्ण केली आव्हानात्मक आयर्नमॅन स्पर्धा

बारीक सारीक कामासाठी केंद्राचे दरवाजे ठोठवावे लागणार हे सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेर आहे. केंद्राने दिलेल्या मुदतीत हरकत घेण्याची मुदत संपून गेली, पण गोवा सरकारने हरकत घेण्याविरुद्ध ‘ना हरकत’ प्रस्ताव पाठविला आहे.

गंभीर विषयावर कोणीच गांभीर्याने पाहिले नसल्याने आज सांगे विकास मंचच्या नावाने सभा घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. या विषयाची पूर्ण कल्पना स्थानिक आमदाराना दिली होती, पण ते सभेला का उपस्थित राहिले नाहीत? याची कल्पना दिली नसल्याचेही आनंद गावकर यांनी स्पष्ट केले.

हा विषय केवळ सांगेपुरता नसून सांगे, केपे, काणकोण, सावर्डे, वाळपई, पर्यें या मतदारसंघाला बाधणारा आहे, म्हणून या लोकप्रतिनिधींनी वेळीच जागृत होऊन लोकांना त्रासात टाकू नये, असेही यावेळी गावकर यांनी सांगितले.

जि. पं. सदस्य सुरेश केपेकर म्हणाले, अभयारण्याप्रमाणे या झोनचा त्रास लोकांना होणार असल्याने भविष्यात अधिक त्रास होण्यापेक्षा आत्तापासून विरोध व्हायला हवा. काकोडकर, चंदा वेळीप यांनी आपले विचार मांडले. अनिल काकोडकर यांनी सूत्रसंचालन केले.

राज्यभर जागृती करणार

गोमंतक गौड मराठा समाजाचे अध्यक्ष विश्वास गावडे म्हणाले, कष्टकरी, कमकुवत घटकांना त्रासदायक ठरणारा हा विषय सांगे पुरता न राहता संपूर्ण गोवाभर जागृती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जनतेचे जीवन उद्‍ध्वस्त करणारा कायदा रद्द करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.

सांगेतील समाविष्ट गावे

साळावली, कुर्डी, नायकीणी, डोंगर, दिगाळी, नुने, वेर्ले, तुडव, पोत्रे, भाटी, पट्टे, शोगोणे, विळियण, डोंगुरली, रिवण, कोळंब, उगे, या गावाचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com