Saleri: साळेरी होणार आधुनिक किनारी मत्स्यपालन गाव, मत्स्यपालन विभागाचा प्रस्ताव

Saleri Modern Coastal Aquaculture Village: केंद्र सरकारच्या पुढाकाराने, मत्स्यपालन विभागाने काणकोण तालुक्यातील खोला पंचायतीमधील साळेरी गावाला एकात्मिक आधुनिक किनारी मत्स्यपालन गाव म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Saleri Modern Coastal Aquaculture Village
Saleri Modern Coastal Aquaculture VillageDainik Gomantak
Published on
Updated on

आगोंद: केंद्र सरकारच्या पुढाकाराने, मत्स्यपालन विभागाने काणकोण तालुक्यातील खोला पंचायतीमधील साळेरी गावाला एकात्मिक आधुनिक किनारी मत्स्यपालन गाव म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

या योजनेत तरंगत्या जेट्टीचे बांधकाम आणि प्रमुख मत्स्यपालन पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण यांचा समावेश आहे. प्रस्तावित प्रकल्पात सध्याच्या फिशिंग रॅम्पची दुरुस्ती व नूतनीकरण, जाळी दुरुस्ती शेडची पुनर्बांधणी, गाळ काढण्याची व्यवस्था आणि अंदाजे ४०x३ मीटर मापाच्या तरंगत्या जेट्टीची स्थापना यांचा समावेश आहे.

Saleri Modern Coastal Aquaculture Village
Goa Accident: दोनापावल-बांबोळी मार्गावर आलिशान भरधाव कारचा कहर; ठोकर दिल्याने तरुणी ठार, युवक गंभीर

हा प्रकल्प केंद्राच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने (PMMSY) अंतर्गत पारंपरिक मत्स्यपालन पायाभूत सुविधा आधुनिकीकरण आणि स्थानिक मच्छीमार समुदायांसाठी सुविधा सुधारण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे.

Saleri Modern Coastal Aquaculture Village
Goa Unemployment Rate: गोव्यात बेरोजगारी 8.3 टक्के! युवकांना रोजगार देण्यात भाजप सरकार अपयशी, काँग्रेसची टीका

मत्स्यपालन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या योजनेत बोटींची ये-जा सुलभ करण्यासाठी साळेरी नदीकिनारी तरंगते पँटून आणि गँगवे सुविधांची तरतूद आहे. प्रस्तावित एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे १३९.६० चौरस मीटर असून, त्यापैकी २०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र पारंपरिक रॅम्पच्या विकास व नूतनीकरणासाठी वापरले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com